आज पनवेलकर गिरवणार आरोग्यदायी आहाराचे धडे

By Admin | Updated: November 30, 2014 23:18 IST2014-11-30T23:18:10+5:302014-11-30T23:18:10+5:30

उत्तम आरोग्याकरिता संतुलित आहार घेणे गरजेचे असते. मात्र हे संतुलन कसे करायचे, याबाबत अनेक जण अनभिज्ञ असतात.

Today, healthy eating lessons will be taught by Panvelkar | आज पनवेलकर गिरवणार आरोग्यदायी आहाराचे धडे

आज पनवेलकर गिरवणार आरोग्यदायी आहाराचे धडे

पनवेल : उत्तम आरोग्याकरिता संतुलित आहार घेणे गरजेचे असते. मात्र हे संतुलन कसे करायचे, याबाबत अनेक जण अनभिज्ञ असतात. पनवेलकरांना याबाबत शास्त्रशुध्द माहिती मिळावी, या उद्देशाने सिटीजन्स युनिटी फोरमने रविवारी शहरात सुप्रसिध्द आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांना निमंत्रित केले आहे. निमित्त आहे पनवेल संवादमाला. लोकमत या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.
दैनंदिन धावपळीमुळे अनेकदा आरोग्याकडे लक्ष पुरवले जात नाही. त्याची काळजी घेण्याकरिता अनेकांकडे वेळ नसतो. परिणामी, आरोग्य बिघडत जाते. उत्तम आरोग्याकरिता व्यायामाबरोबरच संतुलित आहाराचीही आवश्यकता आहे. या आहारात कशाचा समावेश असतो. तो कधी घ्यायचा, त्याचे फायदे काय, याबाबत कित्येकांना माहिती नसते. परिणामी, त्यांना इच्छा असतानाही संतुलित आहार घेता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून सिटीजन्स युनिटी फोरमने पनवेल संवादमालेमध्ये आहाराविषयी मार्गदर्शन ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुप्रसिध्द आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांना पनवेल येथे रविवारी निमंत्रित केल्याचे आयोजक अरुण भिसे यांनी सांगितले.
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता ही संवादमाला होणार या वेळी दिवेकर लिखित आहारविषयक पुस्तकाचे प्रशासनही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. दिवेकर या पनवेलकरांशी संवाद साधणार असून त्यांच्या विवेचनात संतुलित आहाराचे सर्व पदर उलगडणार आहेत. त्याचबरोबर सातत्याने पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. हे व्याख्यान आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आणि उपयोगी असल्याने पनवेलकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ आणि कफच्या वतीने करण्यात आले आहे. दिवेकर यांच्याबरोबरच यावेळी जगद्विख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकरही उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: Today, healthy eating lessons will be taught by Panvelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.