आज सफाई कर्मचार्‍यांचे कुटूंबासमवेत आंदोलन

By Admin | Updated: May 12, 2014 23:53 IST2014-05-12T21:09:19+5:302014-05-12T23:53:06+5:30

मुंबई महानगरपालिकेचे सफाई कामगार आज (मंगळवारी) कुटूंबासमवेत आझाद मैदानात निदर्शने करणार आहेत. पालिका वसाहतींचा पुनर्विकास करताना कर्मचार्‍यांचे राहत्या जागेवरच पुनर्वसन करण्यासाठी कामगारांसोबत त्यांचे कुटूंबही या आंदोलनात सामील होणार असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष नवनाथ महारनवर यांनी सांगितले.

Today the agitation with the families of the cleaning staff | आज सफाई कर्मचार्‍यांचे कुटूंबासमवेत आंदोलन

आज सफाई कर्मचार्‍यांचे कुटूंबासमवेत आंदोलन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे सफाई कामगार आज (मंगळवारी) कुटूंबासमवेत आझाद मैदानात निदर्शने करणार आहेत. पालिका वसाहतींचा पुनर्विकास करताना कर्मचार्‍यांचे राहत्या जागेवरच पुनर्वसन करण्यासाठी कामगारांसोबत त्यांचे कुटूंबही या आंदोलनात सामील होणार असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष नवनाथ महारनवर यांनी सांगितले.
महारनवर म्हणाले, राहत्या घरापासून दूर पुनर्वसन केल्याने कर्मचार्‍यांच्या मुलांच्या शैक्षणिकसह कौटूंबिक व्यवहारावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय माहूल आणि चेंबूरसारख्या ठिकाणी पुनर्वसन करणार्‍या महापालिकेने त्याठिकाणी शाळा, रूग्णालय आणि इतर सोयी पुरवलेल्या नाहीत. त्यामुळे आहे त्या जागी संक्रमण शिबिर बांधून कामगारांचे पुनर्वसन करण्याची मागणी महारनवर यांनी केली आहे.
सध्या पालिकेतर्फे कर्मचारी राहत असलेल्या इमारती धोकादायक ठरवून त्यांतील वीज आणि पाणी जोडण्या तोडून महापालिका दबावतंत्र वापरत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. ते पालिकेने त्वरित बंद करण्याची मागणी करत महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी कर्मचार्‍यांसोबत त्यांचे कुटूंबही मंगळवारी आझाद मैदानावर धरणे धरणार आहेत.

Web Title: Today the agitation with the families of the cleaning staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.