टीएमटी आता वांद्रे, अंधेरीर्पयत
By Admin | Updated: October 30, 2014 01:48 IST2014-10-30T01:48:54+5:302014-10-30T01:48:54+5:30
ठाणोकर प्रवाशांना थेट मुंबईर्पयतचा आरामदायी प्रवास करता यावा आणि आपल्या उत्पन्नात भर पडावी, म्हणून ठाणो परिवहन सेवेने (टीएमटी) आता एक पाऊल पुढे टाकले आहे.

टीएमटी आता वांद्रे, अंधेरीर्पयत
ठाणो : ठाणोकर प्रवाशांना थेट मुंबईर्पयतचा आरामदायी प्रवास करता यावा आणि आपल्या उत्पन्नात भर पडावी, म्हणून ठाणो परिवहन सेवेने (टीएमटी) आता एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजने’अंतर्गत (जेएनएनयूआरएम) तब्बल साडेनऊ कोटींच्या निधीतून 1क् नव्याको:या वातानुकूलित बसेस खरेदी केल्या आहेत. सध्या ही सेवा वांद्रे आणि अंधेरीर्पयत सुरू करण्यात आली आहे.
सध्या टीएमटीच्या ताफ्यात 313 बसेस आहेत. त्यातल्या निम्म्याच म्हणजे 16क् बसेस रस्त्यावर धावतात. त्यामुळे प्रवाशांची संख्या मोठी असूनही टीएमटीची सेवा अपुरी पडत आहे. मुंबईला सकाळी जाणारा मोठा वर्ग आहे. हाच फायदा घेऊन बेस्टने कॅडबरी, लोकमान्यनगर, बाळकुम, पवारनगर, वृंदावन, हिरानंदानी, खारेगाव आणि सर्वात जास्त प्रवासी देणारी बोरिवली या बसेस सुरू केल्या आहेत. या सर्वच मार्गावर बेस्ट चांगल्या प्रकारे यशस्वी ठरली. त्यातच, नवी मुंबई महापालिकेनेही आधी चेंदणी-कोळीवाडा आणि आता ठाणोमार्गे बोरिवली बसेस सुरू केल्या.
इतर उपक्रमांना ठाण्यातून चांगला प्रतिसाद मिळत असताना टीएमटीची अवस्था मात्र गंभीर होत चालली होती. आता ठाण्यातून मुंबईकडे जाणा:या प्रवाशांना सेवा देण्यासाठी टीएमटीनेही पुढाकार घेतला आहे. जेएनएनयूआरएम योजनेतील 23क् पैकी 1क् वातानुकूलित व्होल्वो बसेसची खरेदी करण्यात आली आहे. या बसेसपैकी 14क् बसेस सेमी लो फलोअर, 5क् मिडीबसेस तर 4क् वातानुकूलित बसेस आहेत. नव्या एसी बसेस आता प्रायोगिक तत्त्वावर हिरानंदानी ते बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि कासारवडवली ते सीप्झमार्गे अंधेरी पूर्व या मार्गावर सुरू करण्यात येणार आहेत.
या नव्या मार्गावर मिळणारा प्रतिसाद पाहून पुढे दादर आणि इतर मार्गावरही टीएमटीने पुढचे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. टीएमटीच्या बहुतांश बसेस या 1क् ते 12 वर्षे जुन्या असल्याने 75 बसेस या सध्या दुरुस्तीसाठी आगारात तसेच कार्यशाळेत आहेत. त्यासाठीच 3क्क् नवीन बसेस घेण्याचे सूतोवाच पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी केले होते. यात 3क् एसी बसेसचा समावेश आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 1क् बसेस आता दाखल झाल्या आहेत. लवकरच आणखी 22क् बसेस टप्प्याटप्प्याने खरेदी केल्या जाणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)
बीकेसीसाठी 75 रुपये तर अंधेरीसाठी 85 रुपये तिकीट दर आकारण्यात येणार आहे. कासारवडवली ते अंधेरी पूर्व ही बस सकाळी 7 वाजून 1क् मिनिटांपासून दर अध्र्या तासाने सुटणार आहे. (शेवटची बस रात्री 8.2क् वाजता सुटेल.) हिरानंदानी ते बीकेसी बस सकाळी 7 पासून अध्र्या तासाने (शेवटची बस रात्री 8.1क् वा.) तर बीकेसी ते हिरानंदानी ही बस सकाळी 8.4क् पासून दर अध्र्या तासाने सुटणार (शेवटची बस रात्री 9.5क् वाजता) आहे.