टीएमटीचा आतबट्ट्याचा खेळ
By Admin | Updated: November 18, 2015 00:53 IST2015-11-18T00:53:55+5:302015-11-18T00:53:55+5:30
मागील तीन वर्षापासून असलेली परिवहनच्या १९० बसची प्रतिक्षा आता संपणार आहे. येत्या काही महिन्यात त्या टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यानुसार प्रति

टीएमटीचा आतबट्ट्याचा खेळ
ठाणे : मागील तीन वर्षापासून असलेली परिवहनच्या १९० बसची प्रतिक्षा आता संपणार आहे. येत्या काही महिन्यात त्या टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यानुसार प्रति किलोमीटर तत्त्वावर त्या निगा व देखभालीकरीता १० वर्षाकरीता खाजगी संस्थेला दिल्या जाणार आहेत. परंतु, या प्रस्तावानुसार पहिल्या वर्षी २७.५६ कोटी तर दहाव्या वर्षी तब्बल ५३.६१ कोटींची तूट सोसणारा आतबट्ट्याचा प्रस्ताव परिवहनने मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर ठेवला आहे. त्यामुळे त्याला मंजुरी मिळणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.
आता नव्याने दाखल होणाऱ्या २२० पैकी ३० एसी बस यापूर्वीच दाखल झाल्या आहेत. उर्वरित १९० बस या खाजगी संस्थेच्या माध्यमातून चालविण्याचा निर्णय परिवहनने घेतला आहे. चालक ठेकेदाराचा तर वाहक परिवहनचा असेल. त्यांची निगा, देखभाल ठेकेदार करणार आहे. पुढील १० वर्षाकरीता या बस ठेकेदाराला देणार आहे. यामध्ये परिवहन १४० सेमी लोअर फ्लोअरबससाठी ६६ रुपये आणि ५० मिडी बससाठी ५३ रुपये प्रतिकीमी दर ठेकेदाराला अदा करणार आहे.
ठेक ा प्रस्ताव महासभेच्या पटलावर
या बसेससाठी परिवहन मार्फत तीन वेळा निविदा मागविल्या होत्या. परंतु, त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर या निविदेत काही प्रमाणात बदल सुचविले आहेत. त्यानंतर दोन निविदाकारांपैकी एकाला निवडले आहे. त्यानुसार आता या संदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवला आहे.
या प्रस्तावानुसार या ठेक्याअंतर्गत उपक्रमास अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न प्राप्त झाले अथवा हमी किमीपेक्षा कमी किमी झाले तरी सुद्धा ठेकेदारास हमी दिलेल्या मासिक किमी मर्यादेप्रमाणे देय रक्कम परिवहन सेवेसे देणे बंधनकारक असणार आहे.
संपूर्ण संचलनावर परिवहन सेवेचे नियंत्रण राहणार असून, बसमार्ग, बसफेऱ्या, वेळापत्रक, प्रवासी सुचना आदीबाबत वेळोवेळी बदल करण्याचे अधिकारही परिवहन सेवेचे राहतील.
सहा महिन्यांच्या दरांचा आढावा
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक धोरणानुसार व प्रसिद्ध केलेल्या निविदेनुसार कंत्राटदाराचे मासिक देयक अदा करण्यासाठी एक महिन्याच्या शुल्का एवढी रक्कम बँकेत परिवहन सेवेस ठेवावी लागणार आहे. तसेच दर सहा महिन्यांच्या दरांचा आढावा घेण्यात येईल. डिझेल दरात वाढ अथवा कपात झाल्यास निश्चित केलेल्या सूत्रानुसार दर कमी अथवा जास्त करावे लागणार आहे.
या बससापासून प्राप्त होणारे उत्पन्न व करावा लागणारा खर्च यामध्ये मोठी वित्तीय तूट निर्माण होणार आहे. ती सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या बसेस व चालू मार्गावर काढलेली आहे. त्यानुसार परिवहनला पहिल्या वर्षी २७.५६ कोटींची तूट सहन करावी लागणार आहे. दुसऱ्या वर्षी २९.१८, तिसऱ्या वर्षी ३०.५०, चवथ्या वर्षी ३३.७२, पाचव्या वर्षी ४३.४९, सहाव्या वर्षी ३८.६२, सातव्या वर्षी ४२.८७, आठव्या वर्षी ४७.२६, नवव्या वर्षी ५१.१०, दहाव्या वर्षी ५३.६१ कोटींची तूट परिवहनला सहन करावी लागणार आहे.
बसवरील जाहीरातीमधून मिळणारे उत्पन्न परिवहन सेवेस मिळणार आहे.