टीएमटीचे भाडे वाढले
By Admin | Updated: July 17, 2015 01:07 IST2015-07-17T01:07:03+5:302015-07-17T01:07:03+5:30
परिवहनच्या बसभाडेवाढीच्या प्रस्तावावर अखेर प्रादेशिक परिवहन विभागाने शिक्कामोर्तब केले असून, शुक्रवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी प्रवाशांना ५ऐवजी

टीएमटीचे भाडे वाढले
ठाणे : परिवहनच्या बसभाडेवाढीच्या प्रस्तावावर अखेर प्रादेशिक परिवहन विभागाने शिक्कामोर्तब केले असून, शुक्रवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी प्रवाशांना ५ऐवजी ७ रुपये मोजावे लागणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी मार्च २०१३मध्ये परिवहनने पहिल्या टप्प्यासाठी १ रुपयाची भाडेवाढ केली होती. त्यानंतर, आता दोन वर्षांनंतर पुन्हा भाडेवाढ केली आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यासाठी २ रुपये, त्यानंतरच्या पुढील टप्प्यासाठी ३ रुपये आणि त्यानंतरच्या टप्प्यासाठी ५ रुपयांची भाडेवाढ केली आहे. डिझेलच्या वाढत्या भावामुळे सुरुवातीला ही भाडेवाढ केल्याचे परिवहनने सांगितले आहे. डिझेलचे दरवाढीचे प्रमाण हे सरासरी २४.०६ टक्के आणि सीएनजी दरवाढीचे प्रमाण हे १८.४१ टक्के एवढे आहे. तसेच टायर, स्पेअरपार्ट व इतर वस्तूंचे दर वाढल्याने ही दरवाढ केल्याचे परिवहनने स्पष्ट केले आहे. याशिवाय, परिवहनला येणारी मासिक तूट ही १९१.५४ कोटींची आहे. साध्या बसपाठोपाठ वातानुकूलित बसचीदेखील भाडेवाढ होणार असून, पहिल्या टप्प्यासाठी प्रवाशांना ५ रुपये, दुसऱ्या टप्प्यासाठी १० रुपये आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १५ रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत. सध्या साध्या बसचे भाडे हे ५ रुपये आहे. ते आता ७ रुपये होणार आहे. तसेच ११ऐवजी १३ तर १० किमीच्या पुढे १८ रुपयांऐवजी २१ रुपये मोजावे लागणार आहेत. एसी बसचे सध्या पहिल्या टप्प्याचे भाडे १५ असून, ते आता २० रुपये होणार आहे, तर शेवटच्या टप्प्याचे भाडे ७५वरून ८५ रुपये होणार आहे.
साधी बसदरएसी बसदर
०-१० किमी२ रुपये०-१६५ रुपये
१०-२४ किमी३ रुपये१६-३६१० रुपये
२४ ते पुढे५ रुपये३६ ते पुढे१५ रुपये