टीएमटीच्या 230 बस पाच महिने उशिरा
By Admin | Updated: September 15, 2014 22:42 IST2014-09-15T22:42:53+5:302014-09-15T22:42:53+5:30
केंद्र सरकारने जेएनएनयूआरएमची योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याने ठाणो परिवहन सेवेत दाखल होणा:या 23क् बसेसचा मार्ग खडतर झाला होता.

टीएमटीच्या 230 बस पाच महिने उशिरा
अजित मांडके - ठाणो
केंद्र सरकारने जेएनएनयूआरएमची योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याने ठाणो परिवहन सेवेत दाखल होणा:या 23क् बसेसचा मार्ग खडतर झाला होता. मात्र, मागील आठवडय़ात झालेल्या बैठकीत या बसच्या निर्णयाला जवळपास ग्रीन सिग्नल मिळाला आहे. परंतु, विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे त्यांचा टीएमटी अर्थात ठाणो परिवहनमध्ये होणा:या समावेशाचा मार्ग आणखी पाच महिन्यांनी लांबला आहे.
सध्या ठाणो परिवहन सेवेची अवस्था बिकट असून आजही हव्या त्या प्रमाणात बस दुरुस्त होत नसल्याने वागळे आणि कळवा आगारांतून पाहिजे त्या प्रमाणात बस रस्त्यांवर धावताना दिसत नाहीत. सोमवारी वागळे आगारातून 125 आणि कळवा आगारातून 32 अशा एकूण 157 बस रस्त्यावर धावू शकल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी हाच आकडा 2क्क् ते 21क् च्या घरात होता. परंतु, बस बिघडण्याचे प्रमाण वाढल्याने हा आकडा पुन्हा रोडावल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार, नव्याने दाखल होणा:या 23क् बसकडे सर्वाच्या नजरा लागल्या होत्या. 31 मार्चपूर्वी त्यांच्या खरेदीचा अंतिम प्रस्ताव केंद्राकडे पाठवणो गरजेचे होते. परंतु, त्यालाही परिवहनने उशिर केला होता. त्यामुळे या बसेस दाखल होतील अथवा नाही, याबाबत शंका निर्माण झाल्या होत्या.
दरम्यान, मागील आठवडय़ात दिल्लीत झालेल्या केंद्रीय स्तरावरील बैठकीत जेएनएनयूआरएमअंतर्गत सुरूअसलेल्या प्रकल्पांची माहिती घेण्यात आली. यामध्ये ठाणो परिवहनच्या 23क् बसचाही समावेश होता. या वेळी परिवहनने या 23क् बससंदर्भात आतार्पयत कशा पद्धतीने हालचाली करण्यात आल्या, याची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच ठरवून दिलेल्या तारखेनंतर जरी हा प्रस्ताव केंद्राकडे सादर झाला असला तरी तो आता केंद्राने मान्य केला असल्याचे परिवहन सूत्रंनी सांगितले. त्यामुळे आता या बस खरेदीचे प्रकरण मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यासंदर्भात रिलीज ऑर्डरही देण्यात आल्या असून केवळ विधानसभेची आचारसंहिता लागल्याने या कामात थोडासा उशिर होईल, अशी माहिती या सूत्रंनी दिली. निवडणूक पार पडल्यानंतर या कामाला वेग येईल आणि पाच महिन्यांत त्या परिवहनच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने दाखल होतील, असेही या सूत्रंनी स्पष्ट केले. दरम्यान, याकरिता आगार उपलब्ध व्हावे, यासाठी ओवळा आणि मुल्लाबाग येथील डेपोचे काम दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे.
मागील तीन वर्षापासून परिवहनमध्ये दाखल होणा:या 1क् मिनीबसेसपैकी पाच बस दाखल झाल्या असून यापैकी 3 बसेस रस्त्यावर धावू लागल्याचा दावा परिवहनने केला आह़े दोन बसचे रजिस्ट्रेशन येत्या दोन ते तीन दिवसांत होणार आहे. तसेच पाच बसची पूर्तता करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याचेही सूत्रंनी स्पष्ट केले आहे.
मीरा रोडच्या त्या बंद मार्गावर अखेर परिवहनकडून पाच बस सुरू
ठाणो : लोकमान्यनगर ते मीरा रोड या मार्गावर धावणा:या खाजगी ठेकेदाराच्या 25 बसचे आयुर्मान संपल्याने 1 सप्टेंबरपासून त्या ठेकेदाराने बंद केल्या होत्या. त्यामुळे परिवहनला या मार्गावरील प्रवासी आणि उत्पन्नाला मुकावे लागले होते. यासंदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर येथील प्रवाशांची संख्या आणि उत्पन्नाचे प्रमाण लक्षात घेऊन परिवहनने या मार्गावर नव्याने पाच बस सुरू केल्या आहेत.
ठाणो परिवहन सेवेची सुरुवात झाल्यानंतर परिवहनने प्रथमच खाजगी ठेकेदारामार्फत 2क्क्6 मध्ये लोकमान्यनगर ते मीरा रोड असा लांब पल्ल्याचा मार्ग सुरू केला. या बसवर चालक ठेकेदाराचे आणि वाहक परिवहनचे नेमण्यात आले होते. 25 बसच्या माध्यमातून हा प्रवास सुरू झाला होता. यामुळे परिवहनच्या उत्पन्नातसुद्धा यामुळे भर पडू लागली. पाच वर्षाचा करार ठेकेदाराबरोबर करण्यात आला होता. हा करार संपुष्टात आल्यानंतर ठेकेदाराला तीन वेळा मुदतवाढ दिली गेली. परंतु, त्याची मनधरणी करण्यात आली. मागील सहा महिन्यांपासून उर्वरित बसचा कालावधीदेखील संपुष्टात आल्याने रस्त्यांवर बसची संख्या रोडावली. त्यानंतर, 1 सप्टेंबरपासून त्या रस्त्यांवर धावणोच बंद झाले. बस बंद झाल्याने या मार्गावरील 12 हजार प्रवासी आणि दिवसाच्या 5क् हजार उत्पन्नालादेखील परिवहनला मुकावे लागण्याची वेळ आली होती. यासंदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच परिवहनने त्याची दखल घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी आणि उत्पन्नासाठी या मार्गावर आता आपल्या सेवेतील मार्कोपोलोच्या पाच बस सुरू केल्या आहेत़ त्यांच्या दिवसाला 2क् फे:या सध्या होत आहेत. पुढील आठवडय़ात आणखी पाच बस या मार्गावर सुरू केल्या जाणार आहेत.