तिस्ता सेटलवाड यांना अटकपूर्व जामीन

By Admin | Updated: August 12, 2015 03:16 IST2015-08-12T03:16:12+5:302015-08-12T03:16:12+5:30

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Tista Setalvad arrested for anticipatory bail | तिस्ता सेटलवाड यांना अटकपूर्व जामीन

तिस्ता सेटलवाड यांना अटकपूर्व जामीन

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
परदेशातून निधी घेताना तिस्ता यांच्या सामाजिक संघटनेने केंद्र सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा सीबीआयने नोंदवला आहे. यात अटकपूर्व जामीन मिळावण्यासाठी तिस्ता व त्यांचे पती जावेद आनंद यांनी अर्ज केला होता. न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात सीबीआयने या अर्जाला विरोध केला. हे दोघेही तपासाला सहकार्य करीत नाहीत. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास ते देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकते, असा दावा सीबीआयने केला होता.
मात्र या प्रकरणात आपल्याला जाणीवपूर्वक अडकवले असल्याचा युक्तिवाद तिस्ता व त्यांचे पती जावेद आनंद यांनी केला. तो ग्राह्य धरीत न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला. उभयतांना जामीन मंजूर झाल्यास ते देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकेल किंवा जनहिताच्या विरोधात असेल, असे वाटत नसल्याचे मत व्यक्त करीत न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला. तसेच तिस्ता व त्यांचे पती यांनी तपासात सहकार्य करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले
आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Tista Setalvad arrested for anticipatory bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.