केमिकलसह टँकर जप्त

By Admin | Updated: September 22, 2014 00:58 IST2014-09-22T00:58:54+5:302014-09-22T00:58:54+5:30

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तेलमाफीया पुन्हा सक्रिय झाले असून रात्री गस्त घालणाऱ्या मनोर पोलिसांनी दुर्वेस गावाच्या हद्दीत टँकरमधून केमिकल्स उतरविणा-या टँकरचालकास पकडले

Tinker with chemicals seized | केमिकलसह टँकर जप्त

केमिकलसह टँकर जप्त

मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तेलमाफीया पुन्हा सक्रिय झाले असून रात्री गस्त घालणाऱ्या मनोर पोलिसांनी दुर्वेस गावाच्या हद्दीत टँकरमधून केमिकल्स उतरविणा-या टँकरचालकास पकडले. मात्र माल घेणारे दोघे तेल माफीया टेम्पोसह पसार झाले. मनोर पोलीस त्यांना पकडण्यात अपयशी ठरले.
मनोर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार २१ सप्टें. रोजी पहाटे ४.४५ वा. च्या सुमारास सहा. पो. निरिक्षक एम. पाटील यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गस्त घालत असताना दुर्वेस गावाजवळ हॉटेलसमोर अवैधरित्या टँकरमधून एका बॅरलमध्ये केमिकल भरले जात असताना करीत असताना रंगेहात पकडला. टँकर चालक मनोर पोलीसांच्या हाती लागला असून मात्र दोन लोक दुसरा टेम्पो घेऊन पसार झाले. त्यांना पकडण्यास पोलीसांना अपयश आले. पुन्हा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तेल माफीया आपले डोके वर काढू लागले. घोडबंदर ते तलासरी पर्यंत हॉटेल धाब्यांवर रात्री बेरात्री टँकर मधून विविध केमिकल्स, आॅईल काढले जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे . (वार्ताहर)

Web Title: Tinker with chemicals seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.