पेण अर्बन कर्मचा:यांवर उपासमारीची वेळ
By Admin | Updated: July 24, 2014 02:17 IST2014-07-24T02:17:39+5:302014-07-24T02:17:39+5:30
दिवाळखोरीत निघालेल्या पेण अर्बन बँकेतील कर्मचा:यांना एक वर्षापासून वेतन मिळालेले नाही. जवळपास 14क् कर्मचा:यांवर उपासमारीची वेळ आली

पेण अर्बन कर्मचा:यांवर उपासमारीची वेळ
नवी मुंबई : दिवाळखोरीत निघालेल्या पेण अर्बन बँकेतील कर्मचा:यांना एक वर्षापासून वेतन मिळालेले नाही. जवळपास 14क् कर्मचा:यांवर उपासमारीची वेळ आली असून संसाराचा गाडा चालवायचा कसा, असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करीत आहेत.
रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य समजली जाणारी पेण अर्बन बँक दिवाळखोरीत निघालेली आहे. या बँकेच्या सर्व शाखांमध्ये मिळून जवळपास 33क् कर्मचारी काम करीत होते. यामधील बहुतांश कर्मचा:यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तर सद्य:स्थितीत जवळपास 14क् कर्मचारी काम करीत आहेत. प्रशासकाच्या मार्गदर्शनाखाली हे कर्मचारी कजर्वसुली व इतर कामे करीत आहेत. या कर्मचा:यांना एक वर्षापासून वेतन दिलेले नाही. काहींच्या घरांचे हप्ते थकले आहेत. घर चालविण्यासाठीही कर्ज काढावे लागत आहे. मुलांच्या शिक्षणाची फीही परवडेनाशी झाली आहे. कर्मचा:यांना सुरक्षितता व आर्थिक स्थैर्य मिळावे, बँकेवर आलेल्या आर्थिक संकटात कर्मचा:यांना आर्थिक व मानसिक मनोबल मिळावे यासाठी दोन बडय़ा कर्मचारी संघटनाही स्थापन झाल्या होत्या. परंतु त्यानंतरही कर्मचा:यांना काहीही उपयोग झालेला नाही.
बँकेच्या झालेल्या स्थितीस जबाबदार असणारे काही जण सोडून गेले आहे. सद्यस्थितीमध्ये जे बेजबाबदार कर्मचारी व अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. नवीन नोकरी शोधण्याचे वय निघून गेले आहे. अशा स्थितीमध्ये कर्मचा:यांनी करायचे काय, असा प्रश्न कर्मचा:यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)
वसुलीअभावी वेतन रखडले
थकीत कर्ज वसुलीचे काम सुरू आहे. कर्मचा:यांनी त्यांना वसुलीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे. त्यांनी केलेल्या वसुलीपैकी 2क् टक्के रक्कम वेतनावर खर्च करता येईल. अपेक्षित वसुली नसल्यामुळे वेतन देता आले नाही, अशी प्रतिक्रिया बँकेचे प्रशासक शरद जरे यांनी दिली.
च्एक वर्ष पगार नसल्याने घर चालवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. कर्जाचे हप्ते थकू लागले असून शासनाने कर्मचा:यांना न्याय मिळवून द्यावा, अशी प्रतिक्रिया यशवंत चव्हाण या कर्मचा:याने व्यक्त केली.
च्पगार नसल्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला असून उपासमारीची वेळ आली असून लवकर वेतन मिळावे एवढीच आमची मागणी आहे, असे राजू गायकवाड या कर्मचा:याने सांगितले.