‘व्हिक्टोरिया’वर वेळेचे बंधन

By Admin | Updated: May 31, 2014 02:56 IST2014-05-31T02:56:51+5:302014-05-31T02:56:51+5:30

कुलाबा, नरिमन पॉइंटसह फोर्ट परिसरात धावणार्‍या व्हिक्टोरियावर राज्य शासनाने वेळेचे बंधन घातले आहे़

Time binding on Victoria | ‘व्हिक्टोरिया’वर वेळेचे बंधन

‘व्हिक्टोरिया’वर वेळेचे बंधन

मुंबई : कुलाबा, नरिमन पॉइंटसह फोर्ट परिसरात धावणार्‍या व्हिक्टोरियावर राज्य शासनाने वेळेचे बंधन घातले आहे़ मुख्यत: मनोरंजनासाठी, पर्यटनासाठी वापरण्यात येणार्‍या व्हिक्टोरियामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एन.एस. रोड व फोर्ट परिसरात स. ९ ते दु. १२ आणि सायं. ५ ते ६ या वेळेत तर गोराई व्हिलेज परिसरात सायं. ६.३० ते स. ६ या कालावधीतच घोडागाडी चालवण्याची परवानगी दिली आहे. मुंबईतील वाढलेली लोकसंख्या व वाहनांची संख्या, अपुर्‍या पार्किंग व्यवस्थेमुळे वाहतुकीऐवजी मनोरंजनासाठी वापरण्यात येणार्‍या या घोडागाड्यांवर निर्बंध टाकण्यात येत असल्याचे आज जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले. एस.एन. रोड, फोर्ट व गोराई व्हिलेज परिसरात ठरावीक वेळेत घोडागाडी चालवण्याची परवानगी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Time binding on Victoria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.