Join us  

संजय निरुपम यांच्या तिकिटांवरून विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 4:28 AM

काँग्रेस पक्षाच्या उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील तिढा अजून सुटलेला नाही. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तिकीटांवरून निरुपम विरोधी गट आक्रमक झाले आहेत.

- मनोहर कुंभेजकरमुंबई  - काँग्रेस पक्षाच्या उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील तिढा अजून सुटलेला नाही. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तिकीटांवरून निरुपम विरोधी गट आक्रमक झाले आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून त्यांना तिकीट न देता त्यांना पूर्वीच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून तिकीट द्यावे यासाठी काँग्रेसचे जेष्ठ नेते आक्रमक झाले आहेत.मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी २०१४ची लोकसभा निवडणूक उत्तर मुंबईतून लढवली होती. मात्र आता उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक असून त्यांनी दिल्ली दरबारी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.निरुपम यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून तिकीट न देता, त्यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातूनच तिकीट देण्यातयावे यासाठी आता काँग्रेसमधले काही नेते आक्रमक झाले आहेत. माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, माजी मंत्री नसीम खान, माजी आमदार बलदेव खोसा यांनी संजय निरुपम यांना उत्तर मुंबई मधूनच उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षाला आपला पूर्वीचा उत्तर मुंबई मतदारसंघ सोडून उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून तिकीट दिल्यास चुकीचा संदेश जाईल. त्याचा परिणाम आमच्याही निवडणुकांवर होईल, अशी भूमिका त्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडेमांडली आहे.काँग्रेसमधूनच विरोधनिरुपम यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट देऊ नये यासाठी कामत गटही सक्रिय झाला आहे.कामत गटाचे महेश मलिक, गणेश यादव, प्रियांका चतुवेर्दी, जया पेंगल, सय्यद गयासुद्दीन, भावना जैन, मुन्ना मिश्रा, छोटेलाल सिंग, जयकांत शुक्ला आदी कार्यकर्ते दिल्लीत गेले काही दिवस तळ ठोकून बसले आहेत.कामत गटाने दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, वाय. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली आहे.

टॅग्स :संजय निरुपमलोकसभा निवडणूक