वृद्धेच्या डोळ्यात मसाला फेकून घरात चोरी

By Admin | Updated: June 2, 2017 06:10 IST2017-06-02T06:10:29+5:302017-06-02T06:10:29+5:30

कर्जबाजारी झालेल्या एका इसमाने त्याच्या मित्राच्या आईच्या डोळ्यात मसाला फेकून तिच्या घरात दरोडा टाकला. वांद्रे परिसरात

Throwing the spices in the eyes of the elderly stole the house | वृद्धेच्या डोळ्यात मसाला फेकून घरात चोरी

वृद्धेच्या डोळ्यात मसाला फेकून घरात चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्जबाजारी झालेल्या एका इसमाने त्याच्या मित्राच्या आईच्या डोळ्यात मसाला फेकून तिच्या घरात दरोडा टाकला. वांद्रे परिसरात हा प्रकार घडला असून अवघ्या चोवीस तासांत गुन्हे शाखेच्या कक्ष नऊने दोन जणांच्या मुसक्या आवळल्या. समीर रायचुरकर (३२) आणि इस्माईल शेख (३०) अशी अटक दोघांची नावे आहेत.
रायचुरकर हा मोटर मॅकेनिक असून पीडित राजलिंग मर्चंट (६०) यांच्या मुलाचा मित्र आहे. तर शेख हा प्लंबर असून भिवंडीचा राहणारा आहे. मर्चंट या वांद्रे पश्चिमेकडील रोशन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या मुलासोबत राहतात. दरम्यान, मर्चंट यांचा मुलगा काही दिवसांसाठी मित्रांसोबत लडाख येथे फिरण्यासाठी गेला होता. याची माहिती रायचुरकरला होती.
मंगळवारी रायचुरकर मर्चंट यांच्या घरी गेला. त्यांच्या डोळ्यात त्याने मसाला फेकून चाकूचा धाक दाखवत जवळपास सहा लाखांचा ऐवज घेऊन पसार झाला. या घरफोडीप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखादेखील करत होती. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तसेच जवळपास एकोणीस लोकांची चौकशी गुन्हे शाखा कक्ष नऊचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई आणि त्यांच्या पथकाने केली.
त्यानुसार या दोघांना अटक करण्यात आली. कर्जबाजारी झाल्याने चोरी करून याद्वारे कर्ज फेडण्याचा कट रायचुरकरने रचला होता. गुन्हे शाखेने हा तपास करत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.

Web Title: Throwing the spices in the eyes of the elderly stole the house