फोल्डिंग रांगोळीला भरभरून प्रतिसाद

By Admin | Updated: October 17, 2014 01:03 IST2014-10-17T01:03:35+5:302014-10-17T01:03:35+5:30

रांगोळी हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते. 64 कलांपैकी एक कला म्हणजे रांगोळी. रांगोळी ही प्रत्येक शुभप्रसंगी, सणासुदीला काढली जाते. पुरातन काळापासून रांगोळी काढण्याची परंपरा आहे.

Throng response to the folding rangoli | फोल्डिंग रांगोळीला भरभरून प्रतिसाद

फोल्डिंग रांगोळीला भरभरून प्रतिसाद

महेश बाफना - मुंबई
रांगोळी हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते. 64 कलांपैकी एक कला म्हणजे रांगोळी. रांगोळी ही प्रत्येक शुभप्रसंगी, सणासुदीला काढली जाते. पुरातन काळापासून रांगोळी काढण्याची परंपरा आहे. ही 
रांगोळी आधी हाताने काढली जाई. आता या रांगोळीमध्येसुद्धा आधुनिकीकरणाने प्रवेश केला आहे. या वर्षी तयार ‘फोल्डिंग रांगोळी’ला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. 
आधी ठिपक्यांची रांगोळी काढली जाई. पुढे मग चाळणीने रांगोळी काढण्याची स्टाईल आली. सप्तरंगांची उधळण करणा:या या रांगोळी प्रकारात नंतर वेगवेगळे प्रकारही आलेत. फुलांची रांगोळी, पाण्यातील रांगोळी, विविध धान्यापासून बनलेली रांगोळी, संस्कारभारतीची त्यांच्या शैलीतील खास रांगोळी असे प्रकार आलेत. त्यानंतर कागदावरील छापील रांगोळी प्रकार आलेत. यंदाही आतार्पयतच्या सगळ्या रांगोळींच्या पुढची जागा फोल्डिंग रांगोळीने घेतली आहे. या प्रकारात मध्यभागी एक आणि त्याच्या सभोवताली चार, पाच किंवा सहा विविध नावीन्यपूर्ण कलाकृतीच्या आकाराच्या आकृत्या ठेवल्या जातात. या रांगोळ्या उचलून कोणत्याही जागी ठेवता येतात. यातसुद्धा स्वस्तिक, कुयरी, ओम प्रकारास बाजारपेठेत विशेष मागणी आहे. याबद्दल माहिती देताना छबिलदास रोड, दादर (प.) येथील दरेकर सांगतात की, प्लास्टिक कागदावर कुंदन चिकटवून फोल्डिंग रांगोळी तयार केली जाते. आकर्षक प्रकाराने कुंदनवर्क केलेली ही फोल्डिंग रांगोळी सध्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या रांगोळीवर प्रकाश पडला असता ही रांगोळी अधिक खुलून दिसेल, हेही तेवढेच खरे. या रांगोळीचे बाजारभाव सध्या प्रतिनग 8क् ते 2क्क् रुपये असे आहेत. मात्र तरीही ग्राहकांसाठी नवा प्रकार असल्याने या रांगोळीची मागणी वाढत आहे. रांगोळी तयार झाल्यावर रांगोळीवर चमकी टाकणो, हे अनेकांना आवडते. त्यामुळे या चमकीच्या पाकिटांनासुद्धा बाजारपेठेत मागणी आहे. 
फोल्डिंग रांगोळी खरेदी करणा:या पूनम पटेल सांगतात की, जरी ही रांगोळी महाग असली तरी वर्षातून एकदाच हा सण येत असल्यामुळे एवढा खर्च परवडतो. मला माझी रांगोळी सगळ्यांपेक्षा वेगळी हवी असल्याने फोल्डिंग रांगोळीची संकल्पना मला आवडली.
 
लक्ष्मी, सरस्वती, स्वस्तिक, पणती, समई असे चिन्ह असलेल्या छाप्याची रांगोळी, ठिपक्यांचा कागद पसरवून रांगोळी काढणो या प्रकारातल्या रांगोळ्यासुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. बाजारपेठेत पांढ:या रांगोळीची किंमत प्रति पाकीट रु. 1क् आहे, तर रंगीत रांगोळीच्या पाकिटांची किंमत प्रति पाकीट 1क् ते 2क् रुपये आहे. 

 

Web Title: Throng response to the folding rangoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.