तीन वर्षांपासून ४८शाळांना मुख्याध्यापक नाही
By Admin | Updated: December 20, 2014 22:53 IST2014-12-20T22:53:05+5:302014-12-20T22:53:05+5:30
दुसरीकडे पालिकेच्या १२१ शाळांपैकी ४८ शाळांना मागील तीन वर्षापासून मुख्याध्यापक नसल्याची बाब समोर आली आहे.

तीन वर्षांपासून ४८शाळांना मुख्याध्यापक नाही
अजित मांडके ञ ठाणे
ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचा दावा एकीकडे शिक्षण विभाग करीत असला तरी दुसरीकडे पालिकेच्या १२१ शाळांपैकी ४८ शाळांना मागील तीन वर्षापासून मुख्याध्यापक नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या शाळा मुख्याध्यापकांविनाच सुरु आहेत. विशेष म्हणजे नुकताच झालेला क्रीडा महोत्सवदेखील मुख्याध्यापकांविनाच साजरा झाला. त्यात सात शाळा बंद पाडण्याचा घाटही घातला जात असल्याचा आरोप शिक्षक सेनेने केला आहे.
संतापाची बाब म्हणजे उठसुठ मराठीचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेचीच सत्ता महापालिकेत असल्याने त्यांचे बेगडी मराठीप्रेमही या निमित्ताने उघड झाले आहे़
ठाणे महापालिकेच्या ७८ इमारती असून या इमारतींमध्ये १२१ शाळा भरत आहेत. पूर्वी ही संख्या १२७ च्या आसपास होती. परंतु, काही शाळा शिक्षण विभागाने मागील काही वर्षात बंद केल्या आहेत. तसेच आणखी सात शाळा बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाकडून आखला जात आहे. शिक्षण विभागाच्या म्हणन्यानुसार या शाळांचा पट कमी असल्याने त्या शाळा बंद करव्या लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, प्रत्यक्षात शालेय शिक्षण विभागाच्या नियमानुसार ज्या शाळांचा पट २० च्या वर असेल त्या शाळा बंद करता येत नाही, असे असतांनादेखील हा घाट घातला जात असल्याचा आरोप ठामपा प्राथमिक शिक्षण सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी यांनी केला आहे.
दुसरीकडे यंदा शाळेचा पट २ हजाराने वाढल्याचा दावा शिक्षण विभागाने नुकताच केला आहे. असे असतांना आता हा शाळा बंद करण्याचा घाट कशासाठी असा सवाल मात्र उपस्थित झाला आहे. त्यात मागील तीन वर्षापासून महापालिकेच्या १२१ पैकी ४८ शाळांना मुख्याध्यापक नसल्याची बाब समोर आली आहे. परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यापूर्वी देखील ३६ शाळांना मुख्याध्यापक नसल्याची बाब समोर आली होती. या संदर्भातील वृत्त लोकमत मध्ये प्रसिध्द होताच, या शाळांना मुख्याध्यापक देण्याची कार्यवाही केली होती. ४८ शाळांना मुख्याध्यापक नसल्याने या कारभार हा मुख्याध्यापकाविनाच सुरु आहे.
४या शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या २९ शाळांचा समावेश असून उर्दूच्या ११, इंग्रजी माध्यमाच्या ०५ आणि हिंदी माध्यमाच्या ३ शाळांचा समावेश आहे.
४ उथळसर मधील शाळा क्रमांक, ४१, ४३, ५१, ११२, विष्णुनगर १, कळवा २७, २८, ४९, ६९, ७०, ७१, ७२, ९३, ११५, १२९, किसनगर १, मुंब्रा दिवा - ८८,९४, मानपाडा २५,५४,५७, शिळ - २६, ९१, ८९, वर्तकनगर ४४, ४८, ११० अशा एकूण मराठी माध्यमाच्या २९ शाळा आहेत. तर, हिंदी माध्यमाच्या ४१, ५४ ,१२७ या तीन शाळा, उर्दू माध्यमाच्या १४, ४०, ६३, ७४, ७७, ९९, १०४, १०९, १०८, ११३, ११६ अशा ११ शाळा, इंग्रजी माध्यमाच्या ३,७,२३,५२,११८ अशा पाच शाळांचा यात समावेश आहे.
४मागील तीन वर्षापासून महापालिकेच्या १२१ पैकी ४८ शाळांना मुख्याध्यापक नसल्याची बाब समोर आली आहे.