Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video - गोरेगावमध्ये तीन वर्षांचा बालक गटारात पडला; शोधकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 08:29 IST

घटनास्थळी जेसीबीने गटार फोडण्याचे काम सुरू झाले आहे.

मुंबई : गोरेगावमधील आंबेडकर नगरातील नाल्यामध्ये तीन वर्षांचा बालक खेळता खेळता गटारात पडला आहे. 

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून दिंडोशी पोलिसही सोबत आहेत. बचावकार्य सुरू करण्यात आल्याचे डीसीपी विनयकुमार राठोड यांनी सांगितले. 

घटनास्थळी जेसीबीने गटार फोडण्याचे काम सुरू झाले आहे. याठिकाणी मोठी गर्दीही जमलेली आहे. 

 

टॅग्स :मुंबई