Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या हत्येप्रकरणी तिघा महिलांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 05:15 IST

अँटॉप हिल येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. वैद्यकीय तपासणी अहवालानुसार मृत मुलीवर कोणतेही लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलीची हत्या तिच्या नंतेवाईकांनी केली आहे. याबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ चार च्या पोलिस उपायुक्ता एन.अंबिका यांनी दिली.

मुंबई  - अँटॉप हिल येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. वैद्यकीय तपासणी अहवालानुसार मृत मुलीवर कोणतेही लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलीची हत्या तिच्या नंतेवाईकांनी केली आहे. याबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ चार च्या पोलिस उपायुक्ता एन.अंबिका यांनी दिली.४ मे रोजी आरोपी व मुलीचा काही बाबीवर वादविवाद झाला होता त्यानंतर तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. पोस्टमार्टम अहवालानुसार, मुलीचा गळा आवळल्याची खूण आढळून आली आहे. मात्र लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी झालेली नाही. हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप मुलीच्या पालकांनीकेला होता. साबिरा युसूफ (४० वर्षे) व सौलिया सय्यद (३५) व एका अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीन्ही आरोपींविरोधात अ‍ँटॉप हिल पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :अटकगुन्हा