‘स्वच्छ भारत अभियाना’चे तीनतेरा

By Admin | Updated: April 27, 2017 00:23 IST2017-04-27T00:23:25+5:302017-04-27T00:23:25+5:30

पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चे पडसाद देशभर उमटत असताना, मालाड पूर्व आप्पापाडा येथील कबड्डी महर्षी कै. शंकरराव (बुवा) साळवी मैदानातील

Three types of 'Clean India Campaign' | ‘स्वच्छ भारत अभियाना’चे तीनतेरा

‘स्वच्छ भारत अभियाना’चे तीनतेरा

मुंबई : पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चे पडसाद देशभर उमटत असताना, मालाड पूर्व आप्पापाडा येथील कबड्डी महर्षी कै. शंकरराव (बुवा) साळवी मैदानातील स्वच्छतागृहाची दुर्दशा झाल्याने मुलांना आणि ज्येष्ठांना मनस्ताप होत आहे.
या मैदानाच्या नूतनीकरणाचे काम खासदार गजानन कीर्तीकर आणि आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी नगरसेवक प्रशांत कदम यांच्या प्रयत्नाने करण्यात आले, परंतु सध्या ही शौचालये अस्वच्छ बनली असून, मोडकळीसदेखील आलेली आहेत. मैदानाच्या शौचालयात पाण्याची कमतरता, तुटलेले दरवाजे, लाद्या उखडलेल्या आहेत, तर पाण्याचे नळदेखील गायब झाले आहेत. देखभालीसाठी कंत्राटदार मैदानाकडे फिरकतदेखील नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three types of 'Clean India Campaign'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.