महाडमध्ये एकाच रात्रीत तीन दुकाने फोडली
By Admin | Updated: September 22, 2015 00:19 IST2015-09-22T00:19:15+5:302015-09-22T00:19:15+5:30
शहरातील छत्रपती शिवाजी मार्गावरील तीन दुकाने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडली. एकाच रात्रीत तीन दुकाने फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे

महाडमध्ये एकाच रात्रीत तीन दुकाने फोडली
महाड : शहरातील छत्रपती शिवाजी मार्गावरील तीन दुकाने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडली. एकाच रात्रीत तीन दुकाने फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवानिमित्त पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही शहरातील गजबजलेल्या वस्तीत या घरफोड्या झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
श्रीफळ भारतीच्या तळमजल्यावर असलेल्या जयश्री गॅलरीज या गीफ्ट आर्टीकल्स आणि मोबाईल शॉपिंग फोडून चोरट्यांनी सहा हजार रुपयांची रोकड चोरून नेली. तर त्या दुकानाशेजारीच असलेल्या अतुल एंटरप्रायझेस व श्री चामुंडा प्लायवूड अॅन्ड अॅल्युनिमिअम या हार्डवेअर दुकानाचेही शटर्स फोडून चोरट्यांनी दुकानातील रोकड चोरून पलायन केले.
या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरांच्या हालचाली कैद झाल्या असून शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आज
सकाळी घटनास्थळी भेट दिली. (वार्ताहर)