जोगेश्वरी येथे दोन बांगलादेशींसह तिघांना अटक
By Admin | Updated: October 29, 2014 22:08 IST2014-10-29T22:08:15+5:302014-10-29T22:08:15+5:30
जोगेश्वरी येथे दोन बांगलादेशींसह तिघांना अटक

जोगेश्वरी येथे दोन बांगलादेशींसह तिघांना अटक
ज गेश्वरी येथे दोन बांगलादेशींसह तिघांना अटकमुंबई: वर्षभरापासून शहरात अनधिकृत वास्तव्य करणार्या दोन बांगलादेशी नागरिकांसह त्यांना बनावट पासपोर्ट तयार करुन देणार्या एजंटला ओशीवरा पोलिसांनी गजाआड केले. या आरोपींकडून पोलिसांनी बनावट पासपोर्ट हस्तगत केले असून त्यांची अधिक चौकशी सुरु आहे. जोगेश्वरीतील बेहरामपाडा परिसरात गेल्या वर्षभरापासून दोन बांगलादेशी नागरिक अनधिकृतरित्या वास्तव करत असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन दिवस ते राहत असलेल्या परिसरात पाळत ठेवली. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी या आरोपींच्या घरी छापा घालून त्यांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची चौकशी केली असता दोघेही बांगलादेशी असल्याचे उघड झाले. वर्ष भरापूर्वी कोलकातामार्गे दोघेही मुंबईत दाखल झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच आखाती देशात नोकरीला जायचे असल्याने त्यांनी याच परिसरात राहणार्या एका एजंटला बनावट पासपोर्ट तयार करण्यासाठी दिल्याची माहिती देखील त्यांनी पोलिसांना दिली. या पासपोर्टच्या आधारे दोघेही विदेशात जाणार होते. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्या माहितीवरुन पोलिसांनी एजंटला देखील अटक केली असून अशा प्रकारे त्याने आणखी किती जणांना बनावट पासपोर्ट तयार करुन दिले आहेत, याबाबत तपास सुरु असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी)