मुंबई पालिकेचे तीन विभाग रडारवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 07:01 AM2018-06-19T07:01:17+5:302018-06-19T07:01:17+5:30

लोअर परळ येथे आगीच्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी करण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाने समिती स्थापन केली होती. या समितीने पाठपुरावा केला असून, आता मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलासह आरोग्य आणि इमारत प्रस्ताव विभागाकडून समितीने स्पष्टीकरण आणि खुलासे मागविले आहेत.

 Three municipal corporations on radar | मुंबई पालिकेचे तीन विभाग रडारवर!

मुंबई पालिकेचे तीन विभाग रडारवर!

Next

मुंबई : लोअर परळ येथे आगीच्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी करण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाने समिती स्थापन केली होती. या समितीने पाठपुरावा केला असून, आता मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलासह आरोग्य आणि इमारत प्रस्ताव विभागाकडून समितीने स्पष्टीकरण आणि खुलासे मागविले आहेत. त्यामुळे हे तिन्ही विभाग रडारवर आहेत. याशिवाय वन अबव्ह आणि मोजोस बिस्ट्रो कार्यान्वित असलेल्या परिसराचा मालक, परवानाधारक आणि परिचालक यांच्याकडून स्पष्टीकरण मागविले आहे.
अग्निशमन दलाकडून वन अबव्ह उपाहारगृहाचे परिचालन करण्याकरिता एनओसी ही इमारत प्रस्ताव विभागाच्या सदर परिसराचा वापर उपाहारगृह म्हणून करावा या मान्यतेआधीच देण्यात आली. आरोग्य विभागाकडून वन अबव्ह परिसराचा वापर उपाहारगृह म्हणून करावा या मान्यतेआधीच आरोग्य परवानाही देण्यात आला. अग्निशमन दलाने वन अबव्ह उपाहारगृहात दिलेल्या दोन्ही एनओसीमध्ये विसंगती आहे. इमारत प्रस्ताव विभागाकडून वन अबव्ह परिसराचा वापर उपाहारगृह म्हणून करण्याकरिता उपभोक्त्याला मान्यता आणि परिसरामध्ये बांधकाम वाढविणे, बदल करण्याबाबतची मान्यता ‘इझ आॅफ डूइंग बिझनेस’करिता संबंधित प्राधिकरणाकडून त्वरित देण्यात आली. अग्निशमन दलाने एनओसीमधील अटींचे पालन झाले नाही हे निदर्शनास येताच मोजोस बिस्ट्रो या उपाहारगृहाच्या कार्यान्वयास एनओसी देण्यात आली. आरोग्य विभागाने मोजोस बिस्ट्रो उपाहारगृह चालविण्यास परवाना दिला. आग लागली असता काय करावे? या अटींचे पालन झाले आहे की नाही? हे तपासले नाही; आणि तिसऱ्या मजल्यावरील बांधकामास अग्निशमन दलाने मंजुरी दिली. तसेच इमारत प्रस्ताव विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या परवानग्यांचा विचार करण्यात आला नाही; व गच्चीचा वापर ओपन टू एअरसाठी करण्यात यावा म्हणून एनओसी देण्यात आली, असे अनेक शेरे आणि निरीक्षण समितीने नोंदविले आहे.
परिणामी अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग आणि इमारत प्रस्ताव विभागाने त्यांच्या कर्तव्याबाबत स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे, असे समितीने म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे या बाबींचा खुलासा करण्याकरिता संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाला बोलाविण्यात आले आहे. याची सुनावणी १०, ११ आणि १२ जुलै रोजी होणार आहे.
>यांना केली समितीने सूचना...
महापालिका उपायुक्त,
केंद्रीय खरेदी विभाग
मुख्य अग्निशमन दल अधिकारी
महापालिका उपायुक्त, सार्वजनिक आरोग्य
कार्यकारी आरोग्य अधिकारी
मुख्य अभियंता विकास आराखडा
उपमुख्य अभियंता, इमारत प्रस्ताव, शहर
महापालिका उपायुक्त, क्षेत्र-२
साहाय्यक आयुक्त, जी दक्षिण विभाग
वन अबव्ह आणि मोजोस बिस्ट्रोचे मालक, परवानाधारक आणि परिचालक
उच्च न्यायालयात प्रलंबित
दोन पीआयएलचे सर्व पक्ष

Web Title:  Three municipal corporations on radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.