Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाटिया रुग्णालयातील आणखी ११ जणांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 04:01 IST

‘बॉम्बे’तील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह : १०० हून आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात

मुंबई : कोरोनाविषयी खासगी रुग्णालयांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबई सेंट्रल येथील भाटिया रुग्णालयात आणखी ११ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूवीर्ही तेथील १४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे आता ही संख्या २५ वर पोहोचली आहे. या २५ जणांचे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात विलगीकरण करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

भाटिया रुग्णालयातील १५० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातील ११० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ११ जण पॉझिटिव्ह आले आहेत. निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच, रुग्णालयातही निर्जतुंकीकरण करण्यात आले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

बॉम्बे रुग्णालयातील एका वैद्यकीय कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. या कर्मचाºयाने अनेक रुग्ण व गर्भवतींवर उपचार करण्यात सहभाग घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रुग्णालय प्रतिबंधित करावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. ब्रीचकँडी रुग्णालयातील दोन कर्मचाºयांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने तेथील नवीन रुग्ण भरती खंडित करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.शुश्रूषामध्ये क्वारंटाइन असणाºया कर्मचाºयांचे हालच्दादर येथील शुश्रूषा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्यानंतर तेथील अन्य कर्मचाºयांना रुग्णालयातच क्वारंटाइन करण्यात आले. यात ६५ विविध शाखेतील डॉक्टर, कर्मचारी व परिचारिकांचा समावेश आहे.च्मात्र क्वारंटाइनदरम्यान मुलभूत सुविधा नसल्याचा आरोप या कर्मचाºयांनी केला आहे. पिण्याचे पाणी, जेवण, स्वच्छता अशा सेवांचा अभाव असल्याचे सांगत आम्ही इतरांच्या आरोग्यासाठी झटतो. आमचा विचार कधी करणार अशी व्यथा या कर्मचाºयांनी मांडली आहे.पालिकेच्या आदेशानंतर ‘ती’ रुग्णालये होणार पुन्हा कार्यान्वितशहर उपनगरातील हिंदुजा, ब्रीचकॅण्डी, दादरचे शुश्रूषा रुग्णालय, जगजीवन रामनारायण रेल्वे रुग्णालय, पार्थ नर्सिग होम, चेंबूरमधील साई, मुलुंडचे स्पंदन, जोगेश्वरी येथील मिल्लत नगर अशा जवळपास १५ रुग्णालयांमधील सेवा बंद झाल्याने या रुग्णालयांना निजर्तुंकीकरण करण्याची नियमावली दिली असून या आठवड्याभरात रुग्णालयातील काही नमुने तपासणीसाठी पाठवून कोरोना विषाणू संसर्ग नष्ट झाल्याची पडताळणी केली जाईल. त्यानंतर पुन्हा ही रुग्णालये लवकरच पुन्हा खुली केली जाणार आहेत, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या