प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन केल्यास तीन महिने कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 06:52 AM2018-03-17T06:52:37+5:302018-03-17T06:52:37+5:30

प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन करणारे उत्पादक, विक्रेते व ग्राहकांना तीन महिन्यांचा कारावास किंवा २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शुक्रवारी केली.

Three months imprisonment for violating plastic ban | प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन केल्यास तीन महिने कारावास

प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन केल्यास तीन महिने कारावास

Next

मुंबई : प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन करणारे उत्पादक, विक्रेते व ग्राहकांना तीन महिन्यांचा कारावास किंवा २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शुक्रवारी केली.
नंतर कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह पत्रकार परिषदेत बंदीच्या निर्णयाची माहिती दिली. थर्माकोलवरही गुढीपाडव्यापासून बंदी असेल. राज्यात रोज १८०० टन प्लॅस्टिक कचरा निर्माण होतो. त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. दुधाच्या पिशव्या व पाण्याच्या बाटल्यांना पर्याय उपलब्ध न झाल्याने तेथे प्लॅस्टिकला सध्या बंदी नसेल. पर्याय उपलब्ध करण्यास उत्पादकांना सांगितले आहे, असे कदम म्हणाले. प्लॅस्टिकबंदीचा दर तीन महिन्यांनी सरकारतर्फे आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी दर तीन महिन्यांनी प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची बैठक घेतली जाणार असल्याचे या वेळी पर्यावरणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
>यांच्यावर
बंदी नाही
औषधांचे वेष्टन, वन व फलोत्पादन यासाठी, तसेच कृषी, घनकचरा हाताळताना लागणारे प्लास्टिक, रोपवाटिकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वा आच्छादने यांना बंदीतून वगळण्यात आले आहे. मात्र ते कोणत्या कारणासाठी वापरले जाणार हे त्यावर लिहिणे अनिवार्य असणार आहे.
>पिशव्या, बाटल्या द्या, पैसे घ्या
५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या दूध पिशव्या तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांना परवानगी दिली आहे. मात्र यांचा पुनर्वापर व पुनर्निर्मिती बंधनकारक असून ग्राहकांनी त्या पिशव्या किंवा बाटल्या परत देण्यासाठी केंद्रे तयार केली जातील. या पिशव्या परत केल्यास ५० पैसे तर बाटल्या परत केल्यास १ रुपया मिळेल.
>या उत्पादनांवर असेल बंदी
ज्याचे पुनर्निर्माण होत नाही अशा प्लॅस्टिकवर बंदी असेल. त्यात प्लॅस्टिक, थर्माकोलचे ताट, कप, प्लेट, ग्लास, चमचे, स्ट्रॉ, कटलरी, बॅग्स, स्प्रेड शिट्स, प्लॅस्टिक पाऊच, पॅकेजिंग, सर्व प्रकारचे प्लॅस्टिक वेष्टन यांचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण व घाऊक तसेच किरकोळ विक्री व वाहतुकीवर बंदी राहील.

Web Title: Three months imprisonment for violating plastic ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.