खारघरच्या प्रवेशद्वारावर तीन माकडांचे शिल्प

By Admin | Updated: August 18, 2014 01:35 IST2014-08-18T01:35:56+5:302014-08-18T01:35:56+5:30

सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघरच्या प्रवेशद्वारांवर आधुनिक तंत्रज्ञानांचा व साधनांचा वापर करणा-या तीन माकडांचे शिल्प उभारण्यात आले आहे

Three monkey crafts at Kharghar entrance | खारघरच्या प्रवेशद्वारावर तीन माकडांचे शिल्प

खारघरच्या प्रवेशद्वारावर तीन माकडांचे शिल्प

वैभव गायकर, नवी मुंबई
सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघरच्या प्रवेशद्वारांवर आधुनिक तंत्रज्ञानांचा व साधनांचा वापर करणा-या तीन माकडांचे शिल्प उभारण्यात आले आहे. हे शिल्प शहराच्या सौंदर्यात भर घालीत असून ते पाहण्यासाठी पादचाऱ्यांची एकच गर्दी होताना दिसत आहेत.
ड्रीम प्रोजेक्ट म्हणून सिडकोने खारघरची निर्मिती केली. डोंगराच्या सान्निध्यात वसलेल्या या उपनगरात आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्स , सेंट्रल पार्क, उत्सव चौक व शिल्प चौक आदींमुळे शहराकडे चाकरमान्यांचा ओढा वाढताना दिसत आहे. आता यातच गांधीजींच्या तीन माकडांच्या शिल्पाची भर पडली आहे. खारघरच्या अगदी प्रवेशद्वारावरच असलेल्या चौकात साधारण पंधरा फुट आकाराची तीन माकडांची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. हे शिल्प प्रवेशद्वाराच्या सौंदर्यात भर घालीत असून ते पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी होताना दिसत आहे. हिरानंदानी उड्डाणपुलाजवळ असलेल्या खारघरच्या प्रवेशद्वाराजवळील या चौकाचे सुशोभिकरण करण्याची मागणी खारघरवासियांकडून करण्यात येत होती. याची दखल घेत सिडकोने या चौकाचे सुशोभिकरण केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three monkey crafts at Kharghar entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.