Join us  

नाशिक परिक्षेत्रात आढळून आलेली बिबट्याची तीन पिल्ले मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 10:11 PM

या तीन पिल्लांत २ मादी आणि १ नर आहे. त्यांचे सध्याचे वय ३.५/४ महिने असून वजन ३.६, ३.९ आणि नराचे वजन ३.८ किलो आहे.

मुंबई: बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची तीन पिल्ले संगोपनाकरिता आली आहेत. ही पिल्ले नाशिक परिक्षेत्रात आढून आली. येथे त्यांच्या आईला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यांची आई सापडू शकली नाही. यानंतर, पुण्यातील रेस्क्यू संस्थेने त्यांची काळजी घेतली. आता या तिन्ही पिल्लांना पुढील संगोपनाकरिता मुंबईत आणण्यात आले आहे.

या तीन पिल्लांत २ मादी आणि १ नर आहे. त्यांचे सध्याचे वय ३.५/४ महिने असून वजन ३.६, ३.९ आणि नराचे वजन ३.८ किलो आहे. त्यांची देखभाल आणि संगोपन उद्यानातील वन्यप्राणी बचाव पथक आणि संगोपनाचा अनुभव असलेले कर्मचारी करीत आहेत, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील लायन सफारी पार्कचे विभागीय वनाधिकारी विजय बारब्दे यांनी दिली.

टॅग्स :बिबट्यामुंबईनाशिक