तीन लाखांच्या अमली पदार्थांसह दोघांना अटक

By Admin | Updated: December 30, 2014 00:51 IST2014-12-30T00:51:12+5:302014-12-30T00:51:12+5:30

नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात अमली पदार्थांची होणारी तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार रविवारी पोलिसांनी गोरेगाव भागातून दोन आरोपींना अटक केली

Three lakhs of drugs were arrested along with two persons | तीन लाखांच्या अमली पदार्थांसह दोघांना अटक

तीन लाखांच्या अमली पदार्थांसह दोघांना अटक

मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात अमली पदार्थांची होणारी तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार रविवारी पोलिसांनी गोरेगाव भागातून दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ३ लाखांचे अमली पदार्थ हस्तगत केले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही तस्करी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी अमली पदार्थ प्रतिबंधक विभाग तसेच शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यातच नववर्षाच्या स्वागताला सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले जाते.
या पार्ट्यांमध्ये काही ठिकाणी अमली पदार्थांचे सेवनदेखील केले जात असल्याने पोलिसांनी आतापासूनच अमली पदार्थांच्या तस्करीवर बारीक नजर ठेवली आहे. त्यानुसार गोरेगाव परिसरात दोन इसम मोठ्या प्रमाणात मेथाअम्फेटामाइन या अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १२च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार रविवारी मध्यरात्री पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून इरफान मुलानी (३२) आणि चांद मुलानी (४८) या दोन आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्या घेण्यात आलेल्या झडतीमध्ये पोलिसांना हे अमली पदार्थ आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल
करीत त्यांना अटक केली
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three lakhs of drugs were arrested along with two persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.