Join us  

एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात, आई-वडिलांसह मुलगाही ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 8:26 AM

कंटेनरने धडक दिल्यानंतर कार पूर्ण जळून खाक झाली, तर अपघातात कंटेनरचालक जखमी झाला असून, त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.

ठळक मुद्देभीषण अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. यात आई-वडील आणि चार वर्षांचा मुलगा समावेश आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कखोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी गावाच्या हद्दीत मुंबई लेनवर गुरुवारी सायंकाळी भरधाव कंटेनरने  तीन वाहनांना धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. यात आई-वडील आणि चार वर्षांचा मुलगा समावेश आहे.  

कंटेनरने धडक दिल्यानंतर कार पूर्ण जळून खाक झाली, तर अपघातात कंटेनरचालक जखमी झाला असून, त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. मृतांमध्ये जोक्विन चेटियार (३६), लुईझा चेटियार (३५) आणि डॅरील चेटियार (४, रा. नायगाव, मुंबई) यांचा समावेश आहे. लुईझा यांचे वडील जॉन रॉड्रिग्ज (रा. अंधेरी) यांची गाडीही त्यांच्या मागेच होती. त्यांनी सांगितले की, आपल्या चार वर्षांचा नातवाचा नायगावच्या डॉन बॉस्को शाळेमध्ये आजच ऑनलाइन इंटरव्ह्यू झाला होता. पण एक आयुष्य सुरू होण्याच्या अगोदरच मृत्यूने त्याला कवटाळल्यामुळे आपल्या नातवाच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाले. अपघाताचे वृत्त समजताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, आय. आर. बी., डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले आणि वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

लग्नाहून परतत होते कुटुंबीय

आपल्या मुलाचे काल पुण्याला लग्न होते. लग्नाचा कार्यक्रम झाल्यानंतर आज दुपारी २ वाजता पुण्याहून निघालो. कंटेनरने जोरामध्ये आपल्या गाडीलाही कट मारला आणि थोड्याच वेळात समोर आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या गाडीला धडक दिल्याचे जॉन रॉड्रिग्ज यांनी सांगितले.  

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कंटेनरचा अपघात; चालकाचा मृत्यूतलासरी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वडवली येथील निलगिरी हॉटेलसमोर बुधवारी दुपारी झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. तर वाहक किरकोळ जखमी झाला. अब्दुल कादिर अहमदुल्ला खान (३०) असे मृत चालकाचे नाव असून, वाहक अरमान अहमदुल्ला खान हा जखमी असल्याने त्याला तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

टॅग्स :अपघातमुंबई