वरळी सी-लिंकवर अपघातात तिघे जखमी

By Admin | Updated: July 3, 2016 02:07 IST2016-07-03T02:07:41+5:302016-07-03T02:07:41+5:30

पावसाच्या संततधारेमुळे वाहतूक व्यवस्था रखडली असताना वरळी सी-लिंकवर शनिवारी झालेल्या अपघातामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. भरधाव वेगाने जात असलेल्या फोर्ड

Three injured in accident on Worli Sea Link | वरळी सी-लिंकवर अपघातात तिघे जखमी

वरळी सी-लिंकवर अपघातात तिघे जखमी

मुंबई : पावसाच्या संततधारेमुळे वाहतूक व्यवस्था रखडली असताना वरळी सी-लिंकवर शनिवारी झालेल्या अपघातामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. भरधाव वेगाने जात असलेल्या फोर्ड एंडेव्हर मोटारीचा टायर फुटून एका वृद्धासह तिघे किरकोळ जखमी झाले. सकाळी ११च्या सुमारास घडलेल्या या घटनेची नोंद वांद्रे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
राकेश राधेशाम शर्मा (वय ३६), चंद्रकांत दायमा (६७) आणि त्यांचे एक परिचित जितेंद्र चतुर्वेदी (३८) अशी जखमींची नावे असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले. वरळीकडून वांद्रेच्या दिशेने येत असलेल्या फोर्ड एंडेव्हरच्या पुढील चाकाचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती उलटली. त्यातील तिघे जखमी झाले तर दायमा यांचा नातू कृष्णाला काहीही दुखापत झाली नाही. अपघातामुळे मागून येणारी वाहने खोळंबली. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी फोर्ड एंडेव्हर बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Three injured in accident on Worli Sea Link