वसई कोर्टाजवळ तीन घरे फोडली
By Admin | Updated: August 22, 2014 23:23 IST2014-08-22T23:23:41+5:302014-08-22T23:23:41+5:30
मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या वसईत पुन्हा घरफोडय़ांनी डोके वर काढले आहे. वसई कोर्टाजवळ सुरतवाला कॉम्प्लेक्स येथील तब्बल 3 घरे फोडून आतील ऐवज लांबवला.

वसई कोर्टाजवळ तीन घरे फोडली
नायगाव : मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या वसईत पुन्हा घरफोडय़ांनी डोके वर काढले आहे. वसई कोर्टाजवळ सुरतवाला कॉम्प्लेक्स येथील तब्बल 3 घरे फोडून आतील ऐवज लांबवला. राजेश जयस्वाल असे सदनिकाधारकांचे नाव आहे. बंद घरातून ग्रील तोडून आतील 75 हजार रु., 4 मोबाइल्स व घडय़ाळ असा ऐवज चोरटय़ांनी लांबवला.
गुरूवारी रात्री ते शुक्र. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. नजीकच्या इतर दोन सदनिकाही चोरटय़ांनी तपासल्या. त्यांना एका घरात काहीच सापडले नाही. वसई पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो. निरीक्षक म्हात्रे करीत आहेत. (वार्ताहर)