राज्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:59 IST2019-11-12T05:59:37+5:302019-11-12T05:59:38+5:30
राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाल्याने हतबल झालेल्या विविध जिल्ह्यांतील तीन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

राज्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाल्याने हतबल झालेल्या विविध जिल्ह्यांतील तीन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
भोयनी (ता. मानोरा, जि. वाशिम) येथील राजेश रामजी चव्हाण व अमरावती जिल्ह्यातील शेंदूरघाट येथील दिलीप किसनराव आंडे या शेतकºयांनी त्यांच्या शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
तर, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील आदिवासी शेतकरी काशिनाथ सखाराम मेंगाळ (५५) यांनीही अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाल्याने विषप्राशन करून आत्महत्त्या केली.