तीन कोटींच्या जुन्या नोटा जप्त
By Admin | Updated: March 30, 2017 04:30 IST2017-03-30T04:30:39+5:302017-03-30T04:30:39+5:30
साकीनाका येथून तीन कोटींच्या जुन्या नोटांसह ८ व्यापाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या जबरी चोरी-

तीन कोटींच्या जुन्या नोटा जप्त
मुंबई : साकीनाका येथून तीन कोटींच्या जुन्या नोटांसह ८ व्यापाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या जबरी चोरी-दरोडाविरोधी पथकाने ही कारवाई केली. रद्द केलेल्या नोटा बँकेत जमा करण्याची अंतिम मुदतही संपली. तरीदेखील काही जण हा
पैसा बदलून देत असल्याची माहिती ८ व्यापाऱ्यांना मिळाली. पैसे
बदली करण्यासाठी या व्यापाऱ्यांनी मंगळवारी रात्री एकत्रित साकीनाका जंक्शन गाठले होते. काही
जण जंक्शनवर पैसे बदली करण्यासाठी येणार असल्याची माहिती जबरी चोरी-दरोडाविरोधी पथकाला मिळाली.
त्यानुसार, पथकाचे वरिष्ठ निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नागेश पुराणिक, अमित पवार, विजय ढमाळ यांच्यासह १५ जणांच्या अंमलदार पथकाने सापळा रचला. त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्या झडतीत ३ कोटी १३ लाख ३५ हजार रुपये जप्त करण्यात आले.
अब्दुल अन्सारी, गिरीश शाह, रिमांड डिमेलो, सकीब शेख, मुकेश मेहता, विनोद संघवी, फारुख शेख, अन्वर शेख अशी अटक व्यापाऱ्यांची नावे आहेत. कुर्ला, साकीनाका, अंधेरी, अॅण्टॉपहील परिसरात हे व्यापारी राहातात.पैसे बदलून देणाऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. (प्रतिनिधी)