लखनभैया हत्येप्रकरणी तिघांचा जामीन फेटाळला
By Admin | Updated: August 9, 2014 02:07 IST2014-08-09T02:07:54+5:302014-08-09T02:07:54+5:30
बहुचर्चित लखनभैया हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या तीन आरोपींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला.

लखनभैया हत्येप्रकरणी तिघांचा जामीन फेटाळला
>मुंबई : बहुचर्चित लखनभैया हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या तीन आरोपींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. या खटल्यात चकमकफेम प्रदीप शर्मा यांना वगळता उर्वरित 21 आरोपींना दोषी धरत सत्र न्यायालयाने जन्मठेप ठोठावली आह़े
अखिल खान उर्फ बॉबी, हितेश सोलंकी उर्फ डब्बू, विनायक शिंदे उर्फ विनू आणि शैलेंद्र पांडे उर्फ पिंकी या चौघांनी जामिनासाठी स्वतंत्र अर्ज केले होते. या अर्जावर न्या. पी. व्ही. हरदास आणि न्या. अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने बॉबी, डब्बू आणि शिंदे यांचे अर्ज फेटाळले, तर पांडे पॅरोलची मुदत संपूनही कारागृहात न परतल्याने त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेता येणार नाही, असे स्पष्ट केल़े त्यामुळे पांडेच्या वकीलाने अर्ज मागे घेतला. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात शासन व लखन भैयाचे बंधू अॅड. रामप्रसाद गुप्ता यांनी उच्च न्यायालयात अपील केले आहे. तसेच आरोपींची शिक्षा वाढवावी, अशी मागणी करणारी याचिकाही स्वतंत्रपणो दाखल केली. आरोपींच्या जामीन अर्जाना सरकारी वकील अॅड. हितेन डेढीया यांनी विरोध केला. तसेच अॅड. गुप्ता यांच्या बाजूने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ विधिज्ञ विजय प्रधान, अॅड. आर. सत्यनारायणन् यांनीही आक्षेप घेतला.
11 नोव्हेंबर 2क्क्6 रोजी वर्सोव्याच्या नाना-नानी पार्कजवळ रात्री सव्वाआठच्या सुमारास डी. एन. नगर आणि जुहू पोलिसांनी संयुक्तरित्या रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैया याचा एन्काउंटर केला ॅहोता. (प्रतिनिधी)