Join us

नायर रुग्णालयातील तीन आरोपी डॉक्टर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 04:42 IST

प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत शनिवारी नायर रुग्णालयामध्ये रॅगिंग विरोधी समितीची बैठक घेण्यात आली, ती आठ तास चालली.

मुंबई : नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या रॅगिंगच्या जाचाला कंटाळून पायल तडवी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत शनिवारी नायर रुग्णालयामध्ये रॅगिंग विरोधी समितीची बैठक घेण्यात आली, ती आठ तास चालली. चौकशीनंतर प्रसूती विभागातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल तिन्ही डॉक्टर फरार असल्याने त्यांचा जबाब नोंदविण्यात आलेला नाही. त्यांच्यावर रॅगिंगचा आरोप आहे.संबंधित अहवाल आज जाहीर करण्यात येणार आसल्याची माहिती मार्डकडून देण्यात आली आहे. बैठकीमध्ये रुग्णालयातील विद्यार्थी डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञ, कर्मचारी, परिचारिका तसेच विभागप्रमुखांसह समितीमधील विद्यार्थी डॉक्टर प्रतिनिधींचा समावेश होता. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. हा अहवाल सोमवारी वैद्यकीय संचालनालय, एमसीआय, एमयूएचएस यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मार्डकडून देण्यात आली. डॉक्टरांसाठी हेल्पलाइन क्रमांक, समुपदेशन कक्ष सुरू करण्याचे विचाराधीन आहे.