खंडणीसाठी धमकावले
By Admin | Updated: January 10, 2017 04:39 IST2017-01-10T04:39:39+5:302017-01-10T04:39:39+5:30
खंडणीसाठी सायनमधील सराफाला चाकूच्या धाकावर धमकवल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी वडाळा टीटी

खंडणीसाठी धमकावले
मुंबई : खंडणीसाठी सायनमधील सराफाला चाकूच्या धाकावर धमकवल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
सायनच्या चुनाभट्टी परिसरात असलेल्या जय भारत माता नगरामध्ये सराफ बबलू सरदार हे कुटूंबासोबत राहतात. माती गाळून सोने मिळविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री जेवणानंतर सरदार हे घरामध्ये बसले असता तिघे घरात घुसले व त्यांनी धमकी दिली. (प्रतिनिधी)