एसआरएची हजारांवर घरे बिल्डरांना आंदण?

By Admin | Updated: September 5, 2014 02:43 IST2014-09-05T02:43:15+5:302014-09-05T02:43:15+5:30

महानगरात सर्वसामान्य नागरिक घरांच्या तुटवडय़ामुळे नाराज असताना शिवशाही पुनर्वसन प्रकल्पांतर्गत (एसपीपीएल) हजारांवर तयार घरे भाडेतत्त्वावर घेण्यासाठी बिल्डरांना आवाहन केले आहे.

Thousands of SRA homes builders? | एसआरएची हजारांवर घरे बिल्डरांना आंदण?

एसआरएची हजारांवर घरे बिल्डरांना आंदण?

जमीर काझी - मुंबई
महानगरात सर्वसामान्य नागरिक घरांच्या तुटवडय़ामुळे नाराज असताना शिवशाही पुनर्वसन प्रकल्पांतर्गत (एसपीपीएल) हजारांवर तयार घरे भाडेतत्त्वावर घेण्यासाठी बिल्डरांना आवाहन केले आहे. एसआरएच्या योजना राबविणा:यांना हे संक्रमण शिबिर (ट्रान्ङिास्ट कॅम्प) म्हणून दिले जाणार आहेत. मालाड, कांदिवली, अंधेरी, विलेपार्ले आदी उच्चभ्रू भागातील ही घरे असून, ती ताब्यात घेण्यासाठी आठ मोठे बिल्डर इच्छुक आहेत. येत्या आठवडय़ाभरात त्यांचे वाटप केले जाणार असल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले.
मुंबईतील 13 हजारांवर ट्रान्ङिास्टची घरे सध्या बिल्डर, घुसखोर व गुंडांच्या ताब्यात आहेत. प्रय} करूनही ती परत मिळविण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरत असताना पुन्हा ट्रान्ङिास्टच्या निमित्ताने सुसज्ज घरे बिल्डरांना एक प्रकारे आंदण दिल्यासारखे होणार आहे. त्याऐवजी लॉटरी काढून अत्यल्प उत्पन्न गटातील गरजू नागरिकांना देणो सोयीस्कर ठरणारे आहे. राज्यात 15 वर्षापूर्वी युतीचे सरकार असताना झोपडपट्टीमुक्त महानगर करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प योजना राबविण्यात आली होती. एसआरएच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या विविध योजनांमधून शासनाच्या वाटय़ाला शहर व उपनगरातील विविध ठिकाणी एकूण 1258 फ्लॅट मिळाले आहेत. 225 चौरस फुटांच्या या घरांपैकी 1क्क्4 घरे प्रत्यक्षात  एसपीपीएलकडे हस्तांतरित केली असून, उर्वरित 254 घरांचा ताबाही लवकरच प्राधिकरणाला मिळणार आहे. एसआरए योजनेंतर्गत गृहप्रकल्प राबविणा:या बिल्डरांना संबंधित बांधकामाच्या ठिकाणच्या लाभार्थी रहिवाशांना ही घरे तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. अनामत रक्कम आणि सरासरी दरमहा 8 हजार रुपये भाडे व 3 वर्षाच्या मुदतीसाठी दिले जाईल, आवश्यकता वाटल्यास त्यानंतर आणखी कालावधी वाढविण्यात येणार आहे. 
डीआरपीने इच्छुक बिल्डरांना केलेल्या आवाहनानुसार 8 विकासकांनी तयारी दर्शविली आहे. त्यांनी आतार्पयत केलेली कामे, सध्या सुरू असलेल्या योजनांबद्दल खातरजमा करून बिल्डरांची येत्या काही दिवसांमध्ये निवड केली जाईल, असे प्राधिकरणातील अधिका:याने सांगितले.
 डीआरपीला मिळालेल्या संक्रमण शिबिरांपैकी काही ठिकाणो (कंसात उपलब्ध घरे ) : रॉयल अपार्टमेंट, राजन पाडा, मालाड पश्चिम (25), शिवशक्ती गृहनिर्माण संस्था, अंधेरी (126), सीटीएस 138 त्रिवेणीनगर मालाड पश्चिम (64), न्यू ब्ल्यू इम्पेरीयर कॉम्प्लेक्स कांदिवली (28), ङिानत कॉटेज, गावठाण, अंधेरीगाव (7), मनोहर गृह निर्माण संस्था, पांडलोस्कर मार्ग (13), इमारत-(89), 
मानखुर्द (81).
 
च्ट्रान्ङिास्ट घराबाबतच्या वाईट अनुभवामुळे म्हाडाने भविष्यात संक्रमण शिबिर न बांधण्याचा निर्णय घेतला 
आहे. त्यामुळे राज्य सरकार एसपीपीएलची ही घरे बिल्डरांना 
भाडय़ाने न देता अत्यल्प उत्पन्न वर्गातील गरजू नागरिकांसाठी लॉटरी काढून वितरण करू शकते, स्वच्छ प्रतिमा असलेल्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून आचारसंहिता लागू करण्यापूर्वी तातडीने आदेश देण्याची गरज आहे.
 
म्हाडाच्या ट्रान्ङिास्टचा कब्जा 
करणारी कंपनी घरांसाठी इच्छुक
म्हाडाच्या भारतनगर, गोरेगाव, धारावी या ठिकाणच्या संक्रमण शिबिरांवर अनेक वर्षापासून कब्जा असलेली एक कंपनीही एसपीपीएलची घरे घेण्यासाठी इच्छुक आहे. एका महिलेकडून चालविल्या जाणा:या या कंपनीने म्हाडाचे लाखो रुपयांचे भाडे थकविले आहे. मंत्रलय व म्हाडातील वरिष्ठ अधिका:यांशी लागेबांधे असल्याने वसुलीकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आरआर बोर्डामध्ये होत असते.

 

Web Title: Thousands of SRA homes builders?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.