छटपूजेच्या कार्यक्रमात अश्लील ठुमके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2016 05:00 IST2016-11-08T05:00:40+5:302016-11-08T05:00:40+5:30

लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत नालासोपाऱ्यात हिंंदी आणि भोजपुरी गाण्यांवर नृत्यांगनांनी अश्लिल नृत्ये सादर केली. तर विरारमध्ये पालिकेने मनाई केली

Thousands of porn stars | छटपूजेच्या कार्यक्रमात अश्लील ठुमके

छटपूजेच्या कार्यक्रमात अश्लील ठुमके

शशी करपे, वसई
लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत नालासोपाऱ्यात हिंंदी आणि भोजपुरी गाण्यांवर नृत्यांगनांनी अश्लिल नृत्ये सादर केली. तर विरारमध्ये पालिकेने मनाई केली असतांनाही पापडखिंडी तलावात छटपूजा केली गेली. त्यामुळे यंदा वसई विरारमधील छटपूजा वादात सापडली होती.
रविवारी संध्याकाळी आणि सोमवारी पहाटे छटपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत हिंंदी भाषिक विकास मंडळाने मोरेगाव तलावाशेजारी महाछट पूजा आयोजित केली होती. त्यानिमित्ते आयोजिलेल्या करमणुकीच्या कार्यक्रमात नर्तकींनी भोजपुरी, मराठी, हिंदी गीतांवर अश्लिल नृत्ये केली. काहींनी पुरूषांना सोबत घेऊन बिभित्स कृती केल्या. काही दर्शकांनी नोटाही उधळल्या. नृत्यांगना अश्लिल हावभाव करीत असतांना काहींनी त्यांना उचलून नाचण्यापर्यंत मजल मारली. कार्यक्रमाला महिला आणि मुलांचीही हजेरी असतांनाही तोकड्या कपड्यातील अश्लिल नृत्य करणाऱ्या नृत्यांगनांना रोखण्याचे भानही आयोजकांना राहिले नाही.
या कार्यक्रमात तृतीय पंथीयांनाही नाचवण्यात आले. विशेष म्हणजे कार्यक्रमाला अनेक राजकीय पुढाऱ्यांसह काही नगरसेवक आणि एका प्रभाग समितीच्या सभापतींनीही हजेरी लावली होती. स्थानिक पोलिसांनीही या कार्यक्रमाकड़े दुर्लक्ष केले. स्टेजच्या खाली देवी आणि महापुरुषांचे फोटो व वरती नंगानाच असा राडा सुरू होता.
दुसरीकडे पापडखिंडी तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने त्याठिकाणी छटपूजा करू नये असे पालिकेने बजावले असतांनाही परप्रांतियांनी महापालिकेच्या नाकावर टिच्चून मोठ्या प्रमाणात पूजा केली. पालिकेने अवघे पंचवीस रक्षकही तैनात केले होते. परंतु प्रचंड गर्दी असल्याने त्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली. गेल्यावर्षीपर्यंत विरारमधील पापडखिंड तलावात छटपूजेला काही पक्ष आणि संघटनांनी विरोध केला होता. तसेच आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यामुळे गेल्यावर्षी छटपूजा अतिशय साधेपणाने साजरी करण्यात आली होती. यंदा मात्र, छटपूजेविरोधात कुणीही तक्रार केली नव्हती. छटपूजेला वादात टाकणाऱ्या या दोन घटना वगळता वसई, नालासोपारा येथील तलावांमध्ये छटपूजा उत्साहात आणि शांततेत पार पडल्या. अर्नाळा समुद्रकिनारीही यंदा छटपूजेसाठी मोठी गर्दी उसळली होती.

Web Title: Thousands of porn stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.