पॅथॉलॉजीची हजारो दुकाने !
By Admin | Updated: February 1, 2015 00:44 IST2015-02-01T00:44:58+5:302015-02-01T00:44:58+5:30
मुंबईसह राज्यभरात खुलेआम निदानाचा काळाबाजार सुरू आहे. आजच्या घडीला राज्यात सर्वसाधारणपणे २ हजार पॅथॉलॉजिस्ट आहेत.

पॅथॉलॉजीची हजारो दुकाने !
पूजा दामले - मुंबई
मुंबईसह राज्यभरात खुलेआम निदानाचा काळाबाजार सुरू आहे. आजच्या घडीला राज्यात सर्वसाधारणपणे २ हजार पॅथॉलॉजिस्ट आहेत. पण, पॅथॉलॉजी लॅबची संख्या त्याच्या दुप्पट म्हणजे ५ हजार इतकी आहे. पॅथॉलॉजिस्टच्या लॅब सोडल्यास इतर लॅब कोण चालवते? याचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहावी-बारावी इतकेच शिक्षण घेतलेल्या आणि मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण न घेतलेल्या व्यक्ती लॅब चालवण्याचे प्रमाण राज्यभरात तब्बल ६० ते ७० टक्के इतके आहे.
एकूण पॅथॉलॉजी लॅबची नेमकी संख्या उपलब्ध नसली तरी जितक्या अनधिकृत लॅब आहेत (ज्या लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट नसतो) त्यापैकी ६० ते ७० टक्के लॅब या अधिकृत लॅबच्या आजूबाजूच्या परिसरातच सर्रासपणे सुरू आहेत. ग्रामीण भागात पॅथॉलॉजिस्ट नाहीत, यामुळे डीएमएलटीवाले लॅब चालवतात, असे स्पष्टीकरण दिले जाते. पण महापालिका क्षेत्रांमध्ये २० टक्के अनधिकृत लॅब सुरू आहेत.
अनधिकृत लॅब चालवणाऱ्यांपैकी फक्त १० टक्केच जणांनी मान्यताप्राप्त संस्थेकडून डीएमएलटी अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. उर्वरित ९० टक्के व्यक्ती ज्या अनधिकृतपणे लॅब चालवतात, त्यांनी मान्यताप्राप्त संस्थेकडून लॅब टेक्निशियनचे शिक्षण घेतलेले नाही. २० टक्के जणांनी बीएसस्सीचे शिक्षण घेतलेले आहे. तर काही जणांचे शिक्षण इतके कमी आहे की, ते रक्त काढणे, ते प्रोसेस करणे इतकेही करू शकत नाहीत. पण तरीही या व्यक्ती बेधडकपणे पॅथॉलॉजी लॅब चालवत असल्याचे महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी सांगितले.
एखाद्या व्यक्तीचे शिक्षण हे दहावी किंवा बारावी इतकेच झाले असेल तरीही तो सर्रासपणे रक्त, लघवी, बॉडी फ्युएडच्या चाचण्यांचे ‘रिपोर्ट’ तयार करून अनेक रुग्णांचा जीव धोक्यात टाकते आहे. हीच व्यक्ती रिपोर्टवर सह्यादेखील करत आहे. प्रशिक्षण न घेतलेल्या, डॉक्टर नसलेल्या व्यक्तींच्या रिपोर्टवर विश्वास ठेवून डॉक्टर औषधोपचार करीत आहेत. यावरूनच संपूर्ण महाराष्ट्रात पॅथॉलॉजी लॅबची परिस्थिती किती भीषण आहे, हे लक्षात येते. पण तरीही कोणत्याही सरकारी विभागाकडे राज्यात एकूण पॅथॉलॉजी लॅब किती याचे ठोस उत्तर नाही. कारण मुळात पॅथॉलॉजी लॅबसाठी नोंदणीची गरज नसल्यामुळेच हा काळाबाजार सुरू असल्याचे महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट यांचे म्हणणे आहे. (क्रमश :)
जिल्हाअधिकृत अनधिकृत एकूण
लॅब लॅब
सांगली१२७८९०
सातारा१५१३११४६
कोल्हापूर१७१३८१५५
पुणे१८११६१३४
रायगड४०३५७५
रत्नागिरी७४८५५
ठाणे३८३५७३
अहमदनगर९१९६२०५
नंदुरबार४५२५६
जळगाव११६६७७
बुलडाणा५६७७२
अमरावती२१२१४
गोंदिया२२२२४
वर्धा ३०६७९७
भंडारदरा११५०६१
एकूण२२११११३१३३४
च्अधिकृत लॅब म्हणजे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी असणाऱ्या पॅथॉलॉजिस्टच्या लॅब
च्उच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार अनधिकृत लॅब म्हणजे जिथे पॅथॉलॉजिस्ट नसतो