ठाण्याच्या मेट्रोचे आपणच भूमिपूजन करा!
By Admin | Updated: November 13, 2014 23:00 IST2014-11-13T23:00:48+5:302014-11-13T23:00:48+5:30
मुंबईत मेट्रो सुरु झाल्यानंतर नागपूर मेट्रोच्या कामाचा नारळ फुटला आहे. तसेच पिंपरी चिंचवड व पुणो, नवी मुंबई आदी ठिकाणच्या मेट्रोला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे.

ठाण्याच्या मेट्रोचे आपणच भूमिपूजन करा!
ठाणो : मुंबईत मेट्रो सुरु झाल्यानंतर नागपूर मेट्रोच्या कामाचा नारळ फुटला आहे. तसेच पिंपरी चिंचवड व पुणो, नवी मुंबई आदी ठिकाणच्या मेट्रोला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. परंतु, ठाण्याच्या मेट्रो संदर्भात वांरवार चर्चा होऊन या सेवेला अंतिम स्वरुप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे या सेवेच्या भूमीपूजनाचा नारळही आपल्या हस्ते लवकरच फोडण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे राज्यात शिवसेना-भाजपात जुंपली असतांना आपणच तिचे भूमिपूजन करावे, असा आग्रह त्यांनी धरला आह़े यामुळे ठाण्यातील शिवसैनिकांच्या भुवया उंचावल्या आहेत़ विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकशाही आघाडी सरकराने ठाण्याच्या मेट्रो रेल्वेला ग्रीन सिग्नल दिला आहे. तसेच केंद्रीय नगरसविकास मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपालांना निवेदन देऊन या प्रकल्पाच्या कामास गती देण्याबाबत चर्चा झाल्या आहेत. परंतु अद्यापही या प्रकल्पाबाबत अद्यार्पयत कोणताही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे इतर शहरांमध्ये मेट्रोच्या प्रकल्पाला वेग येत असतांना ठाण्यावर अन्याय का? असा सवालही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या कारशेडला काही स्थानिकांचा विरोध असतानाही एमएमआरडीएच्या अधिका:यांनी येथे व्यवस्थितरित्या सव्रेक्षण केले आहे.
(प्रतिनिधी)
विशेष म्हणजे राज्यात शिवसेना-भाजपात जुंपली असतांना आपणच तिचे भूमिपूजन करावे, असा आग्रह त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धरला आह़े यामुळे ठाण्यातील शिवसैनिकांच्या भुवया उंचावल्या आहेत़ ही केवळ जनहिताची औपचारीक मागणी की, पक्ष धोरणाबाहेर जाऊन मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आहे.