Join us  

शुल्लक वादातून तरुणाची निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 5:18 PM

२३ वर्षीय भावेश कोयेची अज्ञात मोटारसायकलांनी केली गंभीर मारहाण 

मुंबई - भायखळ्यातील राणी बागपरिसरातील ई. एस.पठाणवाला रोडवरील महापालिकेच्या पे अँड पार्किंगकरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दोन दुचाकीस्वारांनी किरकोळ वादातून हत्या केली. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.   

काल सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ई. एस. पठाणवाला रोडवर महापालिकेच्या पे अँड पार्किंगमध्ये मोटारसायकल पार्क करण्यास आलेल्या अज्ञात दुचाकीस्वार रॅश ड्राईव्हिंग करत असल्याने पे अँड पार्किंगसाठी काम करत असलेल्या भावेश कोये (वय - २३) या कर्मचाऱ्याने दुचाकीस्वारास मोटारसायकल रॅश ड्राईव्हिंग करत पार्किंग करू नको असे सांगितले. त्यावरून वाद निर्माण करून अज्ञात दुचाकीस्वार आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्राने भावेशला बेदम लाथाबुक्यांनी मारहाण करत स्वतःजवळ बाळगलेल्या चाकूने वार केले. भायखळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि  त्यानंतर जखमी झालेल्या भावेशला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. भावेशसोबत काम करणाऱ्या प्रतिक पडवळ (वय - २६) याने भावेशला वाचविण्याचा प्रयत्न केला. मयत भावेश हा भायखळ्यातच राहणार आहे. भावेशला खून करून अज्ञात आरोपी पसार झाले. त्यानंतर प्रतिकने भायखळा पोलिसांना तक्रार दाखल करत अज्ञात आरोपी कसे दिसत होते.याबाबत माहिती दिली आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही नाही. मात्र, पोलीस फरार आरोपींचा तपास करीत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक परदेशी यांनी दिली. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२, ३२४, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८ आणि १४९ अन्वये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

 

टॅग्स :गुन्हामुंबई