बनावट वेबसाइटवरून शेकडोंची फसवणूक
By Admin | Updated: October 24, 2014 05:45 IST2014-10-24T05:45:59+5:302014-10-24T05:45:59+5:30
म्हाडाच्या नावे बनावट संकेतस्थळ (वेबसाइट) बनवून घर मिळवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला

बनावट वेबसाइटवरून शेकडोंची फसवणूक
मुंबई : म्हाडाच्या नावे बनावट संकेतस्थळ (वेबसाइट) बनवून घर मिळवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून संबंधित वेबसाइट बंद करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. काही महिन्यांपासून ६६६.ेँंंि.ल्ली३ या नावे खोटी वेबसाइट बनवून त्यावर घरांसाठी प्रतीक्षा यादी बनविली होती. प्राधिकरणाच्या प्रशासनाने त्याबाबत तक्रार नोंदविल्यानंतर हे संकेतस्थळ कायमस्वरूपी बंद केले आहे.
बनावट वेबसाइट बनवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आल्याची माहिती म्हाडाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाला मिळाली. त्यांनी त्याबाबत नेट मॅजिक डाटा सेंटरकडून अहवाल मागवून त्यानुसार ही साइट बंद करण्यात आली. म्हाडाची ६६६.ेँंंि.ल्ली३ ही अधिकृत वेबसाइट असून त्यावर सर्व माहिती दिली जाते. म्हाडाच्या घराची सोडत संगणकीकृत व पारदर्शक असून त्यामध्ये कोणाला हस्तक्षेप करणे शक्य नाही. त्यामुळे म्हाडाच्या नावे फसवणूक करणाऱ्या दलाल, मध्यस्थ किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीमार्फत व्यवहार करू नये, त्याला प्राधिकरण जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या कोणाची फसवणूक झाली आहे, त्यांनी खेरवाडी पोलीस ठाणे किंवा सायबर शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात केले आहे.