कठोर आर्थिक शिस्तीचे सूतोवाच
By Admin | Updated: November 2, 2014 01:53 IST2014-11-02T01:53:47+5:302014-11-02T01:53:47+5:30
राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून कठोर उपाययोजना करण्याशिवाय पर्याय नाही, असा कडक इशारा नोकरशाहीने सरकारला दिला.

कठोर आर्थिक शिस्तीचे सूतोवाच
मुंबई : राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून कठोर उपाययोजना करण्याशिवाय पर्याय नाही, असा कडक इशारा नोकरशाहीने सरकारला दिला. राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अद्याप जाहीर होऊ शकले नसले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नऊ सहका:यांनी शनिवारपासून कामकाजाला सुरुवात केली. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वित्त, गृह, ऊर्जा आणि कृषी विभागांच्या सचिवांनी सादरीकरण केले.
राज्याची आर्थिक स्थिती समाधानकारक नाही, अनुत्पादक खर्चाना कात्री लावणो आवश्यक आहे. लोकानुनयासाठी योजना आणताना सरकारच्या तिजोरीवर किती मोठा भार पडतो याचे भान गेल्या काही वर्षात अनेकदा सुटले आहे. यापुढे कृपया असे होऊ देऊ नका, अशी विनंती वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी सादरीकरणात केल्याचे समजते.
कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हे अन्वेषण या दोन स्वतंत्र यंत्रणा करण्याची आवश्यकता आहे. तपासाचा दर्जा वाढला पाहिजे तसेच अपराधसिद्धीचे प्रमाण वाढविण्यावर भर द्या, असे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले. हा दर वाढविण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अमिताभ राजन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या 13 प्रमुख शिफारशी आणि आणखी काही बाबी समाविष्ट करून प्रस्ताव तयार करण्यास फडणवीस यांनी सांगितल्याची माहिती सूत्रंनी दिली. (विशेष प्रतिनिधी)
कार्तिकीच्या पूजेला खडसे जाणार
राज्याचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे हे 3 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय पूजा सप}िक करणार आहेत. आषाढी पूजेचा मान मुख्यमंत्र्यांना, तर काíतकी पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1995 पासून होत असे. या वेळी उपमुख्यमंत्रिपद नसल्याने हा मान ज्येष्ठ मंत्री म्हणून खडसे यांना देण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठक मंगळवारी
च्आजवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक दर बुधवारी होत असे, पण यापुढे ही बैठक मंगळवारी घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
च्सोमवारी आठवडय़ाचा पहिला दिवस, मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक घेतली की आठवडय़ाचे पुढचे तीन-चार दिवस कामकाजासाठी मिळतात, म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
दोन मंत्री जवखेडय़ाला जाणार
कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे हे रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा खालसा येथे तिहेरी हत्याकांड झालेल्या जाधव कुटुंबाची भेट घेणार आहेत.