‘त्या’ पोलिसांची होणार चौकशी

By Admin | Updated: February 6, 2015 01:56 IST2015-02-06T01:56:55+5:302015-02-06T01:56:55+5:30

जुगार अड्ड्यावर जाऊन दबंगगिरी करून तीन लाखांची रोकड लुटणाऱ्या पाच पोलिसांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांची आता विभागीय चौकशी होणार आहे.

'Those' will be investigated by the police | ‘त्या’ पोलिसांची होणार चौकशी

‘त्या’ पोलिसांची होणार चौकशी

जितेंद्र कालेकर ल्ल ठाणे
जुगार अड्ड्यावर जाऊन दबंगगिरी करून तीन लाखांची रोकड लुटणाऱ्या पाच पोलिसांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांची आता विभागीय चौकशी होणार आहे. तसेच नाडारवरही पोलिसांकडून तडीपारीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.
हे प्रकरण सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी यातील कोणाचीही गय न करता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. ठाणे न्यायालयानेही त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरोड्याच्या गुन्ह्णामध्ये अटक झालेल्या आरोपींमध्ये एकही कोपरी पोलीस ठाण्याचा नाही. मोटार परिवहन आणि मुख्यालयात नेमणुकीस असलेल्यांचा ‘रेड’ टाकण्याशी काहीही संबंध नव्हता. कहर म्हणजे तिथून त्यांनी तीन लाखांची रोकडही लुटली. हाणामारीची माहिती एकाने कोपरी पोलिसांना दिली होती. त्यामुळे शोध पथकाने (डीबी) घटनास्थळी धाव घेतली. विभागीय खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे यांनी ‘लोकमत’ला दिली.

च्गेल्या अनेक वर्षांपासून जुगार चालविणारा नाडार कोपरीत कुप्रसिद्ध आहे. त्याच्या अड्ड्यावर गेल्या वर्षभरात पोलिसांनी १० वेळा धाड टाकलेली आहे. मात्र, तरीही तो जागा बदलून अड्डा चालवित होता.
च्३ फेब्रुवारी रोजी रात्री त्याच्या अड्ड्यावर हाणामारी झाल्याचा प्रकार समजल्यानंतर कोपरीच्या शोध पथकाचे उपनिरीक्षक एम.बी. नरवणे, हवालदार के.एस. खोब्रागडे यांनी तिथे पुन्हा धाड टाकली. त्या वेळी तिथून १३ जणांना अटक केली.
च्तेव्हाही त्याने कोपरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षात शिरकाव करून खोब्रागडे यांना धक्काबुक्की केली. पोलिसांच्या ताब्यातील करण खरे याला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणीही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्याच्यावर तडीपारीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

लाखोंची रोकड पाहताच
कर्तव्याचा विसर
१ नौपाड्यातील ठेकेदार व मनसेचा कार्यकर्ता करण खरे आणि अंबरनाथ येथील विष्णू नखाते हे ३ फेब्रुवारी रोजी रात्री ११च्या सुमारास कोपरीत जुगार खेळण्यासाठी गेले होते. जुगारात जिंकलेली रक्कम न मिळाल्यामुळे त्यांचा अड्डाचालकाशी वाद झाला. प्रकरण
हाणामारीपर्यंत गेले.
२खरेने त्याचा पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल मित्र संदीप देसाईला हा प्रकार सांगितला. संदीप हा मयूर ठोगे (मुख्यालय, ठाणे शहर), विनोद नेमाणे, विजेंद्र कदम (दोघेही पोलीस मोटार परिवहन विभाग, ठाणे शहर) आणि स्वप्नील ताजणे (मुख्यालय, ठाणे ग्रामीण) या पाच सहकाऱ्यांना घेऊन तिथे गेला. तिथे आपण कोपरीचे पोलीस असल्याची बतावणी करून जुगारातील रकमेची मागणी केली.
३काही रोकड बाबूने त्यांना दिली. मात्र, वाढीव पैशांसाठी पोलिसांनी मारहाण सुरू केली. तीन लाख सात हजारांची रोकड रोकड एकाच वेळी मिळाल्यामुळे त्यांच्यापैकी कोणीही कोपरी पोलिसांना माहिती न देता पैसे घेऊन पळ काढला.
हाणामारीची माहिती परिसरातील एकाने कोपरी पोलिसांना दिली होती. त्यामुळे शोध पथकाने (डीबी) घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत टोळके पसार
झाले होते.
४कोपरी पोलिसांनीच याबाबतची फिर्याद दाखल करून झायलो गाडीचा क्रमांक आणि इतर माहितीच्या आधारे ४ फेब्रुवारीला पहाटे पोलिसांसह सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख १० हजारांची रोकडही हस्तगत केली आहे.

 

Web Title: 'Those' will be investigated by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.