‘त्या’ २७ गावांसाठी स्वतंत्र पालिका आठवडाभरात?

By Admin | Updated: September 3, 2015 02:06 IST2015-09-03T02:06:46+5:302015-09-03T02:06:46+5:30

कल्याण तालुक्यातील त्या २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकेच्या हालचालींना शासनस्तरावर पुन्हा एकदा वेग आला असून येत्या आठवड्यात तसा निर्णय जाहीर

'Those' 27 days for independent municipal council? | ‘त्या’ २७ गावांसाठी स्वतंत्र पालिका आठवडाभरात?

‘त्या’ २७ गावांसाठी स्वतंत्र पालिका आठवडाभरात?

चिकणघर : कल्याण तालुक्यातील त्या २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकेच्या हालचालींना शासनस्तरावर पुन्हा एकदा वेग आला असून येत्या आठवड्यात तसा निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून लोकमतला मिळाली आहे.१ जूनपासून या गावांचा मनपात समावेश झाल्यानंतरही २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण हक्क समितीचा विरोध कायम असून जर निवडणुका झाल्याच तर एकमुखी बहिष्काराचा निर्णयही समितीने घेतला आहे. याच स्थितीत जर निवडणुका झाल्याच तर जनमताच्या विरोधाचा फटका भाजपालाच बसेल. ही शक्यता लक्षात घेऊनच २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका देऊन विरोध सहन करून बदलाचे राजकारण सुरू आहे. ही शिवसेनेला एक चपराक असून शिवसेनेच्या एकमुखी सत्तेचे स्वप्न उधळण्याचा हा प्रयत्न यशस्वी
होईल, असे प्रयत्न भाजपाचा एक खासदार आणि दोन आमदारांकडून सुरू आहेत. (वार्ताहर)

Web Title: 'Those' 27 days for independent municipal council?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.