मुंबई : वरुणराजाच्या आगमनास तीन महिने शिल्लक असताना, मुंबई महापालिका पावसाळ्यासाठी सज्ज झाली आहे. यंदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून जून ते सप्टेंबर या कालावधीत समुद्राला २४ दिवस भरती असेल. यापैकी जून ते ऑगस्ट या काळात सर्वाधिक मोठी भरती येणार असून १६ जुलैला ४.८९ मीटर उंचीपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. भरतीवेळी समुद्राच्या लाटा ४.५० मीटर उंचीपेक्षाही जास्त उसळतात. पावसाचे पाणी समुद्रात सोडण्याचे पंपिंग स्टेशनचे दरवाजे, सांडपाणी सोडण्यासाठी वापरण्यात येणारे फ्लड गेट्स बंद ठेवण्यात येतात. परिणामी सखल भागात पाणी साचते. दरवर्षी पावसाळ्यात सखल भागात पाणी साचून मुंबईची तुंबई होते. यंदाही समाधानकारक पाऊस आणि समुद्राला भरतीवेळी मुंबई जलमय होण्याचा धोका वर्तवला जात असून खबरदारी घ्यावी लागणार आहे.
खवळलेल्या समुद्रात जाणे, नाैकाविहार करणे धोकादायक ठरू शकते.
भरती कालावधीत कशी घ्याल काळजी?भरतीची वेळ तपासा : समुद्रकिनारी जाण्यापूर्वी स्थानिक हवामान विभाग व प्रशासनाने जाहीर केलेली भरती-ओहोटीची वेळ आणि लाटांची उंची तपासा.
‘सुरक्षित अंतर राखा’भरतीवेळी समुद्राच्या लाटा खूप उंच असू शकतात, त्यामुळे दूर राहणे योग्य.
(यंदा जून ते जुलै मध्ये सहा दिवस सर्वाधिक भरती)जून - १६ जून दुपारी १:०५ वाजता ४.८७ मीटर (उंच लाटा)१७ जून दुपारी १:५५ वाजता ४.८६ मीटर (उंच लाटा)जुलै - १५ जुलै दुपारी १२:५१ वाजता ४.८५ मीटर (उंच लाटा)१६ जुलै दुपारी १:३६ वाजता ४.८९ मीटर (उंच लाटा)ऑगस्ट - ऑगस्ट (पाच दिवस सर्वाधिक भरती)१४ ऑगस्ट दुपारी १:०७ मिनिटांनी ४.८३ मीटर (उंच लाटा) सप्टेंबर - सप्टेंबर (सात दिवस सर्वाधिक भरती)११ सप्टेंबर दुपारी १२ वाजता ४.६५ मीटर (उंच लाटा)
Web Summary : Mumbai prepares for a monsoon with high tides expected June-September. July 16th may see the highest waves at 4.89 meters. Citizens are advised to stay safe near the sea.
Web Summary : मुंबई मानसून के लिए तैयार है, जून से सितंबर तक ऊंची लहरों की आशंका है। 16 जुलाई को 4.89 मीटर तक ऊंची लहरें उठ सकती हैं। नागरिकों को समुद्र के पास सुरक्षित रहने की सलाह दी जाती है।