थर्टीफर्स्ट ‘आॅन-ड्युटी’

By Admin | Updated: December 30, 2014 00:56 IST2014-12-30T00:56:16+5:302014-12-30T00:56:16+5:30

थर्टीफर्स्ट फ्रेंड्ससोबत सेलीब्रेट करता येत नाही याचं थोडंसं दु:ख आहेच... पण ड्युटी कम फर्स्ट! त्यामुळे मग रुग्णांची सेवा करतच नव्या वर्षाचं स्वागत करायचं ठरवलंय.

ThirtyFirst 'Ann-Duty' | थर्टीफर्स्ट ‘आॅन-ड्युटी’

थर्टीफर्स्ट ‘आॅन-ड्युटी’

थर्टीफर्स्ट फ्रेंड्ससोबत सेलीब्रेट करता येत नाही याचं थोडंसं दु:ख आहेच... पण ड्युटी कम फर्स्ट! त्यामुळे मग रुग्णांची सेवा करतच नव्या वर्षाचं स्वागत करायचं ठरवलंय. थर्टीफर्स्ट पार्टीची कसर भरून काढण्यासाठी ‘फर्स्ट जान’लाच माझ्या गँगसोबत कल्ला करत धमाकेदार पार्टी करणार आहोत. मग एखाद्या मित्राच्याच घरी ‘अड्डा’ करून मस्त गाणी, धिंगाणा आणि मस्ती हे समीकरण नक्की असेल.
- डॉ. स्वप्निल कुलकर्णी

कस्टमर्ससोबतच न्यू ईअर ‘पार्टी’
थर्टीफर्स्टच्या रात्री आम्ही कस्टमर्ससाठी खूप वेगवेगळ्या आॅफर्स प्लान करतो. रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या प्रत्येक कस्टमरचा आनंद अधिकाधिक द्विगुणित व्हावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न करीत असतो. या थर्टीफर्स्टसाठी आम्ही खास मॉकटेल्स-कॉकटेल्सचे नवे फ्लेवर्स डिझाइन केले आहेत... हे फ्लेवर्स कस्टमर्सला आवडतील अशी आम्हाला खात्री आहे. मी माझं थर्टीफर्स्ट सेलीब्रेशनही कस्टमर्ससोबतच करणार आहे. शिवाय, आम्ही सगळे सहकारी मिळूनही या पार्टीत एन्जॉय करणार आहोत. पण या सगळ्या ‘सेलीब्रेशन’मध्ये मी माझ्या फ्रेंड्सलाही खूप मिस करणार आहे.
- तुषार कुडतरकर,
बारटेंडर

थर्टीफर्स्ट नाइट्सला वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये फ्युजन म्युझिक, रॅप आणि सध्या सुपरहिट असलेल्या हनी सिंगच्या गाण्यांना जास्त डिमांड आहे. त्यामुळे पार्टीमध्ये ‘डान्स’ आवडणाऱ्या युथग्रुपसोबत आम्ही एन्जॉय करतो. एकदम ‘दिल से’ डान्स करणाऱ्या युथसोबत थर्टीफर्स्ट पार्टी सेलीब्रेट करणार आहे. त्यानंतर सगळ्या आॅर्डर संपवून एखाद्या बीचवर आपल्या गँगसोबत ‘स्पेशल पार्टी’ असेल. आणि थर्टीफर्स्ट ‘नाइट’ डीजेच्या बिझी शेड्यूल्डमध्येच निघून गेली तर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आम्ही धमाकेदार पार्टी करू. - डीजे सागर

थर्टीफर्स्टच्या दिवशी वाऱ्यावर स्वार होऊन पार्टी करायची मजाच वेगळी..! मी एव्हिएशन इंडस्ट्रीत असल्यामुळे टुरिस्टसोबत प्लेन्समधून प्रवास करायची. एअरहोस्टेस म्हणून काम करताना येणारे अनुभवही वेगळे असतात... थर्टीफर्स्टच्या रात्रीही फ्लाइट असेल तर जावंच लागणार; मग कदाचित ‘न्यू इअर’ सेलीब्रेशन फ्लाइटमध्येच होईल... नाहीतर मग माझ्यासारख्याच समदु:खी कलिग्ससोबत आम्ही केक कापून नव्या वर्षाचं स्वागत करणार आहोत.
- शीतल कळके, एअरहोस्टेस

थर्टीफर्स्ट ‘नाइट’ला आमचं रेस्टाँरंट आधीच ‘फुल्ल’ झाल्याने आम्हीही ‘ड्युटीफुल्ल’ असणारं याची आयडिया आलीच होती. पण हा पहिला ‘हटके’ थर्टीफर्स्ट आहे, जो मी ‘आॅनड्युटी’ सेलीब्रेट करणारेय. रेस्टॉरंटमधल्या कस्टमर्ससोबतच पार्टी, एन्जॉयमेंट असेल; त्यानंतर मग सगळ्यांचा थर्टीफर्स्ट ‘दमदार’ करून सकाळी घरच्या मेंबर्ससोबत अनुभव शेअर करणार आहे... सो आय एम एक्साइटेड फॉर धिस थर्टीफर्स्ट!
- मृण्मयी सरेकर

Web Title: ThirtyFirst 'Ann-Duty'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.