मराठी सारस्वतांच्या गौरवाचे ‘लोकमत’चे तिसरे पर्व

By Admin | Updated: August 9, 2014 01:42 IST2014-08-09T01:42:22+5:302014-08-09T01:42:22+5:30

कथा, कादंबरी, कविता, बालसाहित्य, वैचारिक अशा वैविध्यपूर्ण लेखन आविष्कारांचा सन्मान करणा:या ‘लोकमत साहित्य पुरस्कारा’चे तिसरे पर्व सुरू झाले आहे.

The Third Fest of 'Sarvaswati' is the third festival of 'Lokmat' | मराठी सारस्वतांच्या गौरवाचे ‘लोकमत’चे तिसरे पर्व

मराठी सारस्वतांच्या गौरवाचे ‘लोकमत’चे तिसरे पर्व

>पुणो : कथा, कादंबरी, कविता, बालसाहित्य, वैचारिक अशा वैविध्यपूर्ण लेखन आविष्कारांचा सन्मान करणा:या ‘लोकमत साहित्य पुरस्कारा’चे तिसरे पर्व सुरू झाले आहे. सारस्वतांच्या गौरवासाठी ‘लोकमत’ या महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाच्या दैनिकाने या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. यंदा या पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे.
अत्यंत वैशिष्टय़पूर्ण अशा या पुरस्कारांसाठी कोणतेही अर्ज मागविण्यात येत नाहीत. वर्षभरात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची दखल ‘लोकमत’तर्फे घेतली जाते. निवडलेली पुस्तके तज्ज्ञ परीक्षकांपुढे अभिप्रायासाठी ठेवण्यात येतात. त्यांनी निवडलेल्या नावांवर वाचकांकडून मतांद्वारे पसंतीची मोहोर उमटवण्यात येते. अंतिमत: तज्ज्ञ परीक्षकांकडून पुरस्कारासाठी निवड केली जाते. मोठय़ा थाटात, भव्य समारंभात या पुरस्कारांचे वितरण मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते होते. यंदाच्या वर्षीदेखील याच धर्तीवर हा समारंभ होणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप
साहित्यातील विविध प्रकारांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार असून, मुखपृष्ठासाठी चित्रकाराला 11 हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल. पुरस्कारासाठी साहित्यातील कथा, कादंबरी, कविता, ललित गद्य, बालसाहित्य, चरित्र-आत्मचरित्र व वैचारिक हे सात विभाग विचारात घेतले जातील. याशिवाय यावर्षीपासून अनुदान व विज्ञान या दोन साहित्यप्रकारांचाही नव्याने समावेश करण्यात आला आहे. मुखपृष्ठासाठी चित्रकाराचा सन्मान करण्यात येईल. तसेच, मागील वर्षीप्रमाणो याही वर्षी एका प्रतिभावंत साहित्यिकाला ‘जीवनगौरव पुरस्कारा’ ने सन्मानित करण्यात येणार आहे.
जीवनगौरव पुरस्कार
स्वचिंतनाद्वारे साहित्य विश्वात अमूल्य योगदानाद्वारे नवा आयाम देणा:या कलाविष्कारांची निर्मिती करणा:या सारस्वतांना मानाचा मुजरा करण्यासाठी एका मान्यवर साहित्यिकाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The Third Fest of 'Sarvaswati' is the third festival of 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.