टीसीच्या मदतीला तिसरा डोळा; तिकीट नसलेल्या प्रवाशांवर कॅमेरा देखील ठेवणार नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2025 21:37 IST2025-01-30T21:36:22+5:302025-01-30T21:37:54+5:30

त्यांच्यावर कारवाई करताना ते उपयुक्त ठरणार आहे. 

third eye to help tc on western railway now cameras will also keep an eye on passengers without tickets | टीसीच्या मदतीला तिसरा डोळा; तिकीट नसलेल्या प्रवाशांवर कॅमेरा देखील ठेवणार नजर

टीसीच्या मदतीला तिसरा डोळा; तिकीट नसलेल्या प्रवाशांवर कॅमेरा देखील ठेवणार नजर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणीसांना (टीसी ) ड्युटीवर असताना बॉडी कॅमेरे देण्यात येणार आहेत. जेणेकरून तिकीट तपासणी सुरु असताना काही अनुचित प्रकार किंवा वादाचे प्रसंग निर्माण झाल्यास त्याचे रेकॉर्डिंग करणे सोयीस्कर होईल. तसेच त्यांच्यावर कारवाई करताना ते उपयुक्त ठरणार आहे. 

लोकलने वैध तिकिटाशिवाय प्रवास करताना पकडले गेल्यावर प्रवासी बऱ्याचदा दंड भरण्यास तयार नसतात. अशा वेळी वादाचे प्रसंग  निर्माण होऊन मारहाणीच्या घटना देखील घडतात. यामुळे पश्चिम रेल्वेने अशा प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये तिकीट तपासताना टीसींच्या शरीरावर बॉडी कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली आहे. ज्याच्या माध्यमातून विडिओ रेकॉर्ड करण्यात येणार असून  रेल्वे कायदा १९८९च्या कलम १४० अंतर्गत रेकॉर्ड केलेला व्हिडिओ तिकिट नसलेल्या तसेच  दंड भरण्यास इच्छुक नसलेल्या प्रवाशांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी वापरण्यास उपयोक्त ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

प्री-कस्टडी एरिया  

लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करताना पकडल्यानंतर, प्रवाशाने दंड भरण्यास नकार दिल्यास त्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेने रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या  प्री-कस्टडी एरियामध्ये ठेवण्यात येईल. या ठिकाणी त्यांना प्रवास संबंधिताला नियम समजावून सांगितले जातील. असे करूनही जर प्रवासी दंड भरण्यास नकार दे असल्यास एक मेमो जारी करून त्यांना रेल्वे संरक्षण दलाकडे ( आरपीएफ) सुपूर्द केले जाणार आहे. सध्या बोरिवली आणि अंधेरी स्थानकांवर प्री-कस्टडी एरिया  तयार करण्यात येत असून कालांतराने सर्व स्थानकांवर उभारण्यात येणार आहेत. 

२३ जानेवारीपासून तिकीट तपासणीदरम्यान काही स्थानकांवर कॅमेऱ्याची चाचणी घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती, जिथे काही टीसींना कोणतेही बॉडी कॅमेरे देण्यात आले होते. या कालावधीत, लोकलने विना तिकीट प्रवास करणाऱ्या ७००० हून अधिक प्रवाशांना दंड ठोठावण्यात ज्यामुळे ३२.१६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
 
प्रकरणे- १० लाख ६३ हजार ३८१ 
दंड - ५४ कोटी २२ लाख ८३ हजार २४२ 

२३ जानेवारी रोजीच्या विशेष  मोहिमे दरम्यानची कारवाई  

प्रकरणे ७३६२
दंड- ३२ लाख १६ हजार 

पश्चिम रेल्वेवर एकूण टीसी -११००
उपनगरीय टीसी - ४००

तिकीट तपासणीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी बॉडी कॅमेरे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जेणेकरुन विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर वचक ठेवण्यास देखील मदत होणार आहे.  - विनीत अभिषेक, सीपीआरओ, पश्चिम रेल्वे

Web Title: third eye to help tc on western railway now cameras will also keep an eye on passengers without tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.