नामांकित कॉलेजची तिसरी कट आॅफ ९० टक्क्यांवरच
By Admin | Updated: July 8, 2015 00:46 IST2015-07-08T00:46:46+5:302015-07-08T00:46:46+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे तिसरी कट आॅफ लिस्ट अखेर मंगळवारी जाहीर झाली. तिसऱ्या कट आॅफ अखेर २२ हजार २९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाला.

नामांकित कॉलेजची तिसरी कट आॅफ ९० टक्क्यांवरच
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे तिसरी कट आॅफ लिस्ट अखेर मंगळवारी जाहीर झाली. तिसऱ्या कट आॅफ अखेर २२ हजार २९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाला असून नामांकित कॉलेजच्या कट आॅफचा टक्का अखेर ९० टक्क्यांवरच स्थिरावल्याचे दिसले.
दरम्यान, प्रवेश प्रक्रियेनंतर २५ हजारांहून अधिक जागा यंदा रिक्त राहण्याची भीती व्यक्त होत आहे. रिक्त राहिलेल्या जागांचा अहवाल तयार करून त्या आॅफलाइन पद्धतीने भरणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले.
नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळाल्याने चौथी यादी जाहीर करणार नसल्याचे विभागाने स्पष्ट केले. तिसऱ्या कट आॅफमध्ये १९ हजार ९६२ विद्यार्थ्यांना बेटरमेंटचा पर्याय उपलब्ध झाला. तरी कॉमर्स शाखेत १३ हजार ४७८, आटर््समध्ये ६१२ आणि उरलेल्या विद्यार्थ्यांना सायन्समध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यात आणखी
२ हजार ३३३ विद्यार्थ्यांना
आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ८ व ९ जुलैची मुदत दिली आहे. यावेळी कट आॅफमध्ये नाव असून प्रवेश नाकारणाऱ्या महाविद्यालयाची तक्रार विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे करण्याचे आवाहन कार्यालयाने केले आहे.