चोरटय़ांचा धुमाकूळ सुरूच

By Admin | Updated: August 9, 2014 00:13 IST2014-08-09T00:13:04+5:302014-08-09T00:13:04+5:30

भर बाजारपेठेत चो:या करून धुमाकूळ घालण्यास चोरटय़ांनी सुरूवात केली असून नागरिक या प्रकारांनी धास्तावले आहेत.

The thieves of the thieves continued | चोरटय़ांचा धुमाकूळ सुरूच

चोरटय़ांचा धुमाकूळ सुरूच

>वसई/ पारोळ : भर बाजारपेठेत चो:या करून धुमाकूळ घालण्यास चोरटय़ांनी सुरूवात केली असून नागरिक या प्रकारांनी धास्तावले आहेत. काहीच दिवसांपूर्वी खानिवडे परिसराला चो:यांच्या घटनांनी भंडावून सोडल्यानंतर आता पुन्हा वसईमधील खानिवडे, शिरसाड परिसराला चोरटय़ांनी लक्ष्य केले आहे. गुरुवारी रात्री एकाच दिवशी चक्क अकरा चोरीच्या घटना घडल्या आहेत. खानिवडेत 4 दुकाने, सकवार येथे 1 दुकान, भामटपाडा 4 दुकाने व शिरसाड 2 दुकाने अशी एकूण या परिसरातील 11 दुकाने एकाच रात्री चोरटय़ांनी फोडल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शिरसाड पोलीस चौकीला घेराव घालून पोलीस अधिका:यांना धारेवर धरले.
या परिसरात दुकानफोडी व घरफोडीचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आपल्या घरातील ऐवजाचे व दुकानातील वस्तूंचे चोरटय़ापासून रक्षण कसे करावे हा प्रश्न त्यांना पडला आहे. खानिवडे येथे झालेल्या घरफोडीत 24 तोळे सोने व 8क् हजार रू. रोख चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच खानिवडे येथे इलेक्ट्रॉनिक दुकान, आइस्क्रीम दुकान, o्रीराम डेव्हलपर्स कार्यालय तसेच सकवार येथील बिअरशॉप, शिरसाड येथील दूध डेअरी तसेच भामटपाडय़ातील 4 व्यापारी गाळे अशी एकूण 11 दुकाने फोडून त्यामधून हजारोच्या वस्तू चोरून नेल्या. तसेच या भागात चोरटय़ांचे प्रमाण वाढले असताना एकही चोर पोलिसांच्या हाती न लागल्यामुळे कायदा व सुव्यवस्था या भागातील कोमलडून पडली असल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये असंतोष असल्यामुळे नागरिकांनी पोलीस चौकीला घेराव घालून अधिका:यांना फैलावर घेतले. नेहमीच्या या चोरी प्रकरणांनी नागरिक कातावले आहेत. (प्रतिनिधी)
 
4या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस धाक या भागात राहिला नसून आता रस्त्यावर महिलांनाही दागिने घालून चालणो धोक्याचे झाल्यामुळे महिलांमध्येही दहशत आहे असे भूषण किणी यांनी सांगितले.
4वारंवार होणा:या घटनांमुळे स्थानिक ग्रामस्थ रस्त्यावर उतरून रास्तारोको करण्याच्या प्रय}ात होते. माजी खा. बळीराम जाधव व स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचा:यांनी ग्रामस्थांची समजूत घातली. 
 
घरफोडय़ांना आला ऊत
यावेळी अनेक ग्रामस्थांनी पोलीस केवळ रेतीवाल्यांचे ट्रक पकडण्यामध्ये मश्गूल असल्यामुळे घरफोडय़ांना ऊत आल्याचा आरोप केला. नागरिकांची सुरक्षितताही यामुळे धोक्यात आली आहे.

Web Title: The thieves of the thieves continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.