सोनसाखळी चोरणारी तिघांची टोळी अटकेत
By Admin | Updated: December 24, 2014 00:58 IST2014-12-24T00:58:52+5:302014-12-24T00:58:52+5:30
मुंबई, नवी मुंबईसह ठाणे परिसरात सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७ लाख ५० हजारांचे चोरीचे दागिने जप्त केले.

सोनसाखळी चोरणारी तिघांची टोळी अटकेत
नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबईसह ठाणे परिसरात सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७ लाख ५० हजारांचे चोरीचे दागिने जप्त केले.
गुन्हे शाखा पोलिसांचे एक पथक गेला महिनाभर कार्यरत होते. या दरम्यान कामोठे येथे टोळीचा सूत्रधार येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, उपनिरीक्षक किरण भोसले यांच्या पथकाने वेषांतर करून सापळा रचला होता. यावेळी अब्बास ऊर्फ टारझन खान याला अटक करण्यात आली.त्यानंतर सय्यद जाफरी आणि अली हैदर जाफरी यांना अटक केली.
अब्बास खान हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो सोनसाखळ्या चोरी करत आहे. परंतु अद्याप एकदाही तो पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता. या टोळीने मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे परिसरात सोनसाखळी चोरी केल्या असल्याचे उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. अटक केलेले तिघेही मुंब्रा-कौसा परिसरातील असून १५ गुन्ह्यांची तर कळवा, नौपाडा, वर्तकनगर परिसरात ७ गुन्ह्यांचीही कबुली दिली. (प्रतिनिधी)