गाडीची कागदपत्रे घेण्याच्या नावाखाली घरात शिरला चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:06 IST2020-12-24T04:06:57+5:302020-12-24T04:06:57+5:30
लाखोंचे दागिने चोरीला, पवईतील घटना गाडीची कागदपत्रे घेण्याच्या नावाखाली घरात शिरला चोर लाखोंचे दागिने चोरीला, पवईतील घटना लोकमत न्यूज ...

गाडीची कागदपत्रे घेण्याच्या नावाखाली घरात शिरला चोर
लाखोंचे दागिने चोरीला, पवईतील घटना
गाडीची कागदपत्रे घेण्याच्या नावाखाली घरात शिरला चोर
लाखोंचे दागिने चोरीला, पवईतील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घरात लहान मुलगा एकटा असल्याचे पाहून चोराने घरात प्रवेश केला आणि वडिलांनी गाडीची कागदपत्रे मागितल्याचे सांगून दागिने घेऊन पसार झाल्याचा प्रकार पवईत समोर आला आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी अनोळखी ठगाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
पवई परिसरात राहणारे रमेश माळवे (३६) यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडले. पत्नीही कामानिमित्त बाहेर गेली. अशात मुलाला भूक लागल्याने तो ११च्या सुमारास घरी आला. दरम्यान, पावणे बाराच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती घरात धडकली. वडिलांनी गाडीची कागदपत्रे मागितल्याचे सांगून कपाट उघडून पाहणी केली आणि घाईतच निघून गेली. मुलाने याबाबत वडिलांना फोन करून विचारणा करताच वडिलांनी घरी धाव घेतली.
त्यांनी अशा कुठल्याच व्यक्तीला घरी पाठविले नव्हते. त्यांनी कपाट तपासले असता, पत्नीचे १ लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिने गायब असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.